प्रेरणा / यशकथा
State Level Selection :ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडीचा क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद ठसा
निगडी : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथील विद्यार्थ्यांनी आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा परंपरेला नवे यश मिळवून दिले आहे. शाळेचा उत्कृष्ट अटॅकर कु. श्लोक संतोष दळवी याची १४ वर्षांखालील मुलांच्या गटात, तर उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू कु. अर्णा रविंद्र हलिंगळी हिची १४ वर्षांखालील मुलींच्या गटात राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड (State Level Selection) झाली आहे.
(विवेक दिगंबरराव कुलकर्णी )१२ डिसेंबर १९८१ रोजी योगराज आणि शबनम सिंग यांच्या पोटी जन्मलेला हा डावखुरा, शैलीदार फलंदाज म्हणजे भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगातील एक अविभाज्य अध्याय. युवराज सिंग — नाव घेताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो निर्भय आक्रमकपणा, अफाट आत्मविश्वास आणि मोठ्या क्षणांत चमकण्याची दुर्मिळ(Yuvraj Singh) क्षमता.
कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासूनच युवराजने क्रिकेट खेळावर आणि क्रिकेटप्रेमींच्या मनावर आपली छाप उमटवली. जगातील सर्वोत्तम डावखुर्या एकदिवसीय फलंदाजांमध्ये त्याचे नाव आवर्जून घेतले जाते. फलंदाजीसोबतच पार्ट-टाइम फिरकी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या तिन्ही अंगांनी तो संघासाठी अमूल्य ठरला. त्यामुळे भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला नसता(Yuvraj Singh) तरच नवल!
खरे तर कसोटी क्रिकेटमध्ये तो अपेक्षित उंची गाठू शकला नाही, हेही तितकेच सत्य आहे. मात्र क्रिकेट हा केवळ आकड्यांचा खेळ नसतो—तो प्रभावाचा खेळ असतो, आणि त्या प्रभावात युवराज (Yuvraj Singh)अतुलनीय होता.
जवळपास ३०० एकदिवसीय सामने, १४ शतके, ५२ पेक्षा अधिक अर्धशतके आणि ८,७०० हून अधिक धावा; ४० कसोटी सामन्यांत २,००० धावा व ३ शतके; आणि टी-२० क्रिकेटमधील त्याची बादशाही तर आजही अभिमानाने सांगितली जाते. आजही एका षटकात सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. आणि स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले एका षटकातील सहा षटकार — तो क्षण क्रिकेट इतिहासातून कधीच पुसला (Yuvraj Singh)जाणार नाही.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला तोच जोशात आणि करिष्म्याने. २००० च्या आयसीसी नॉकआउट स्पर्धेत नैरोबी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळलेली त्याची ८४ धावांची खेळी म्हणजे एका नव्या ताऱ्याचा उदय होता. त्या एका रात्रीत भारताला आपला पुढचा “पोस्टर बॉय” मिळाला. त्याचे झपाट्याने धाव घेणारे क्षेत्ररक्षण, हवेत झेपावणारे झेल आणि निर्भय फलंदाजी साऱ्यांनाच भुरळ घालून (Yuvraj Singh)गेली.
दोन वर्षांनंतर लॉर्ड्सवर ही कथा आणखी मोठी झाली. २००२ च्या नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात सामना हातातून निसटतोय असे वाटत असताना, युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी उभी केलेली ती भागीदारी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक ठरली. त्या विजयाच्या रात्री बाल्कनीतून उडणारे शर्ट हे फक्त जल्लोष नव्हते—तो भारतीय क्रिकेटच्या नव्या पिढीचा आत्मविश्वास(Yuvraj Singh) होता.
या स्फोटक सुरुवातीनंतर युवराजने मैलाचे दगड रचत गेले. अंडर-१९ विश्वचषक, २००७ चा पहिला टी-२० विश्वचषक आणि २०११ चा ५० षटकांचा विश्वचषक — हे तिन्ही विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये युवराजचे नाव कोरले गेले. विशेषतः २०११ च्या विश्वचषकातील त्याची कामगिरी म्हणजे क्रिकेटमधील परिपूर्णतेचा आदर्शच. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्वगुण — सर्वच बाबतीत अव्वल ठरत त्याने ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा मान (Yuvraj Singh)पटकावला.
पण युवराजचा सर्वात मोठा विजय मैदानावर नव्हे, तर फ्लडलाइट्सपासून दूर मिळाला. कर्करोगाशी दिलेला त्याचा लढा आणि त्यातून मिळवलेले यश हे केवळ वैयक्तिक नव्हते—ते लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान ठरले. आजारातून परत येऊन पुन्हा भारतीय जर्सी परिधान करणे हा फक्त कमबॅक नव्हता, ती एक संजीवनी होती—आशेची, जिद्दीची आणि जिंकण्याच्या(Yuvraj Singh )वृत्तीची.
आज युवराज सिंग ४४ वर्षांचा होत असताना (मागच्याच आठवड्यात त्याचा वाढदिवस साजरा झाला), तो फक्त माजी क्रिकेटपटू नाही; तो एक योद्धा, एक आयकॉन आणि भारतीय क्रिकेटचा जागतिक राजदूत बनलेला (Yuvraj Singh)आहे.
या महान क्रिकेट योद्ध्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा!
युवी — तू फक्त सामने जिंकले नाहीस, तू (Yuvraj Singh)पिढ्यांना स्वप्न पाहायला शिकवलेस.
Girish Prabhune:युवा शक्ती भारताचे भविष्य बदलू शकते – प्रतिभा सृजन व्याख्यानमालेत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी :युवा शक्ती भारताचा चेहरा बदलू शकते, असे प्रेरणादायी प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवड येथील कमला शैक्षणिक संकुलात केले. संस्थेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रतिभा सृजन व्याख्यानमालेचा समारोप उत्साहात झाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रभुणे म्हणाले की, तरुणांनी धाडसाने नवीन वाटा शोधल्या, तर भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्यास वेळ लागणार नाही. भारताचे भविष्य घडविण्याची ताकद युवा वर्गात आहे, यावर त्यांनी भर (Girish Prabhune) दिला.
या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील विलक्षण कार्यासाठी संस्थेच्या वतीने प्रभुणे यांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थापक डॉ. दीपक शहा, अध्यक्षा प्रतिभा शहा, खजिनदार भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा आणि कुटुंबीयांनी पुणेरी पगडी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा (Girish Prabhune) गौरव केला.
पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त करताना प्रभुणे यांनी विमुक्त आणि भटक्या समाजात कार्य करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. वडारी, डोंबारी, पारधी, वडार अशा समाजांनी कला आणि शौर्याने योगदान दिले, तरीही त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा पुरस्कार त्या कष्टकरी समाजाला समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले. २०४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील; पुढील २० ते २५ वर्षात देशातील अनेक समस्या युवा शक्तीच्या बळावर दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त(Girish Prabhune) केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, २००६ मध्ये संस्थेची पायाभरणी झाली आणि आज विविध शाखांमध्ये आठ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेचा सतत प्रामाणिक प्रयत्न असतो, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा आणि समाजातील उल्लेखनीय कार्यकर्त्यांना प्रतिभा जीवन गौरव पुरस्कार देण्याचा संकल्प (Girish Prabhune) त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी आपल्या मनोगतात डॉ. दीपक शहा यांच्या कार्याचा गौरव केला. शून्यातून उभे राहून संपूर्ण संस्थेची निर्मिती करणे हे त्यांचे मोठे कर्तृत्व असल्याचे ते म्हणाले. नेतृत्व आणि कर्तृत्व असतेच, परंतु देण्याची वृत्ती असणे महत्त्वाचे असून डॉ. शहा यांच्यात ती भावनाच दिसते. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, समाज घडवण्याची ताकद एका माणसातही असू शकते आणि प्रभुणे हे त्याचे जिवंत (Girish Prabhune) उदाहरण आहेत
Rayat Shikshan Sanstha:रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्याला चालना मिळावी! – प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे
पिंपरी (दिनांक : १० डिसेंबर २०२५) – “पुस्तकी शिक्षणाबरोबरच पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य उत्साहाने आणि सातत्याने पुढे नेले जावे!” अशी अपेक्षा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते बुधवारी (दि. १० डिसेंबर) संपन्न ( Rayat Shikshan Sanstha)झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, सी-मेट संस्थेचे प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे आदी (Rayat Shikshan Sanstha)मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व महात्मा फुले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून परिषदेचे उद्घाटन करण्यात(Rayat Shikshan Sanstha)आले.
प्रास्ताविक करताना प्रा. दत्तात्रय हिंगणे म्हणाले, “१० ते १८ डिसेंबर या कालावधीत सात दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला आहे.” त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की परिषदेत दररोज वेगवेगळ्या विभागांमार्फत विषयानुरूप मार्गदर्शन केले जाणार( Rayat Shikshan Sanstha)आहे.
परिषदेतील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे –
१० डिसेंबर: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित व संख्याशास्त्र विभाग – “थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन”
११ डिसेंबर: मराठी, हिंदी, इंग्रजी विभाग – “भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान”
१२ डिसेंबर: भूगोल विभाग – “भूगोल आणि शाश्वत पर्यटन”
१३ डिसेंबर: “इमर्जिंग ट्रेण्डस् इन इंटरप्रिनिअरशिप”
१६ डिसेंबर: इतिहास व राज्यशास्त्र विभाग – “भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी”
१७ डिसेंबर: शारीरिक शिक्षण, क्रीडा, मानसशास्त्र व ग्रंथालय विज्ञान विभाग – “एआय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण”
१८ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय चर्चासत्र – “बायो फ्युजन २०२५”
प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आयआयटी मद्रासचे प्रा. डॉ. बीराॅह बैरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. प्रज्ञा भरड, प्रा. गणेश भांगरे, प्रा. विजय वानखेडे, प्रा. पौर्णिमा केंगळे, प्रा. सिमरन मुलाणी व प्रा. काजल धुमाळ यांनी( Rayat Shikshan Sanstha)सहकार्य केले.
प्रा. रीमा बात्रा यांनी नेमकेपणाने सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रसाद बाठे यांनी आभारप्रदर्शन(Rayat Shikshan Sanstha)केले.
Vishwas Patil Felicitation:साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच! – विश्वास पाटील
पिंपरी (दिनांक : १० डिसेंबर २०२५) – “साहित्य निर्मितीची प्रेरणा मला शाळेतूनच मिळाली!” अशी मनापासूनची कृतज्ञता ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे (VishwasPatilFelicitation)व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, श्रीराम विद्या मंदिर, भोजापूर साहित्य कला संस्कृती मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील यांचा नागरी सन्मान करण्यात आला. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा सन्मान संपन्न झाला. भव्य सन्मानचिन्ह व शिवरायांच्या मावळ्यांची पगडी असे या ( VishwasPatilFelicitation )स्वरूप होते.
कार्यक्रमाला त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे, सुदाम भोरे, मुकुंद आवटे, डॉ. रोहिदास आल्हाट, श्रीराम विद्या मंदिरचे अध्यक्ष लालासाहेब जगदाळे, मुख्याध्यापिका संगीता हुंबे, सुनीता भोसले, पुरुषोत्तम सदाफुले आदी मान्यवर (VishwasPatilFelicitation)उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना गुरुजनांच्या संस्कारातून मला साहित्याची प्रेरणा मिळाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावलांजवळ येऊन स्थिरावली आणि तिथून जन्माला आल्या माझ्या महाकादंबऱ्या. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत!” असे ठाम प्रतिपादन त्यांनी (VishwasPatilFelicitation)केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “मोबाइलमध्ये रमलेल्या आजच्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी दर्जेदार साहित्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शालेय संमेलनांतूनच मुलांना साहित्य-कला सादर करण्याची(VishwasPatilFelicitation )पहिली संधी मिळते.”
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविकातून शाखेची साहित्यिक वाटचाल उलगडत, “भोसरी शाखा विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे,” अशी माहिती (VishwasPatilFelicitation)दिली.
कार्यक्रमादरम्यान श्रीराम विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थी संघाच्या स्मरणिकेचे तसेच कवयित्री संजना मगर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात श्रीराम विद्या मंदिरमधील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी नेमकेपणाने सूत्रसंचालन केले तर शंकर गुळवे यांनी(VishwasPatilFelicitation) आभार मानले.
https://youtube.com/watch?v=yp74qdW7ykU&si=RKJxcD2F8zKYu9fm
SankarshanViaSpruha:संकर्षण आणि स्पृहा यांनी श्रोत्यांना हसता-हसता अंतर्मुख केले
विवेक कुलकर्णी:मोरया गोसावी महाराज समाधी संजीवन सोहळ्याच्या ४६४ व्या महोत्सवाच्या चौथ्या दिवशीचा कार्यक्रम हा केवळ कला-सादरीकरण नव्हे, तर भावनांचा अखंड प्रवाह ठरला. स्पृहा जोशी आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना खळखळून हसवतानाच अंतर्मुख करणाऱ्या क्षणांचाही अनुभव दिला. हसवणूक आणि चिंतन — या दोन्ही टोकांना स्पर्श करणारा हा कार्यक्रम रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी(SankarshanViaSpruha) ठसा उमटवून गेला.
मंदार महाराज देव, जितेंद्र देव, अॅड. देवराज डहाळे, अॅड. राजेंद्र उमाप आणि केशव विद्वांस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरया भक्तांसाठी विनामूल्य उत्तमोत्तम कार्यक्रमांची दरवर्षी ज्या प्रकारे आखणी केली जाते, त्याच परंपरेत चौथ्या दिवशीचा हा कार्यक्रमही भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. दोन हजारांहून अधिक रसिक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. अनेकांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला, तरीही सादरीकरणाच्या प्रभावी लयीत कुणाचाही उत्साह कमी (SankarshanViaSpruha)झाला नाही.
टेलिव्हिजनच्या पडद्यावरून घरोगरी पोहोचलेले आणि आपल्या अभिनय व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकलेले संकर्षण आणि स्पृहा यांनी रंगमंचावर आला क्षणातच आपली सहजता, हजरजबाबीपणा आणि भावनिक गुंतवणूक यांच्यामुळे वातावरण रंगवले. देश-विदेशात आजवर १७५ प्रयोग पूर्ण केलेल्या या कार्यक्रमाचा १७६ वा प्रयोग चिंचवडमध्ये पार पडला आणि(SankarshanViaSpruha )तोही प्रचंड उत्साहात.
कार्यक्रमाची सुरुवात होताच त्यांची सुसंवादी जुगलबंदी, कवितांतील सूक्ष्म उपरोध, सामाजिक भान आणि मधूनच डोकावणारी संवेदनशीलता यामुळे रसिक भारावून गेले. कधी ‘आईवरची कविता’ येते आणि सभागृह क्षणात भावुक होते, तर ‘राजकीय कविता’ वातावरणात खळबळ उडवते; ‘माझं नाव संकर्षण’, ‘माझं मत वाया गेलं’ या कवितांमध्ये सामान्य माणसाचा प्रामाणिक आत्मस्वर ऐकू येतो. ‘विठोबा तू दिसलास की…’ मधील भक्तीभाव श्रोत्यांच्या मनाला गहिवरून टाकतो. प्रत्येक कविता एक वेगळी अनुभूती, एक वेगळं जग घेऊन येत(SankarshanViaSpruha )होती.
कविता, गप्पा, किस्से, मुक्तसंवाद आणि अधूनमधून गाणी — या मिश्रणाने हा कार्यक्रम एकच भावना नसून भावविश्वाचा विशाल पट ठरला. प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका उत्स्फूर्त होता की ‘कार्यक्रम संपूच नये’ असा प्रेमळ हट्ट अनेकांनी व्यक्त केला. मात्र वेळेचे आणि महोत्सवाचे नियम पाळत ‘रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला…’ या गीताने कार्यक्रमाची हृद्य सांगता झाली. शेवटच्या गीतासोबतच संपूर्ण सभागृहात एक वेगळी शांतता पसरली — हसण्यानंतर येणारी, मनाला भिडून(SankarshanViaSpruha) जाणारी शांतता.
विनय चेऊलकर (कीबोर्ड) आणि अतुल गोडसे (तबला) यांच्या समर्थ संगीतसाथीने या कार्यक्रमाची सुरावट अधिकच खुलवली. त्यांच्या प्रत्येक तालावर, प्रत्येक सूरावर प्रेक्षकांची भावना अधिक (SankarshanViaSpruha)उंचावली गेली.
कार्यक्रमानंतर शिरस्त्यानुसार पिंपरी-चिंचवड देवस्थानच्या विश्वस्त मंडळींकडून कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. स्मिता जोशी यांनी उत्कट शब्दांत आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा( SankarshanViaSpruha) समारोप केला.
मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या महोत्सवातील हा चौथा दिवस केवळ एक सांस्कृतिक सायंकाळ नव्हता, तर प्रेक्षकांना हसवणारा, विचार करायला लावणारा आणि मनाला स्पर्श करणारा एक बहुरंगी अनुभव ठरला. स्पृहा आणि संकर्षण या कलाजीवांनी साकारलेली कला-फुलं, मोरया भक्तांच्या मनात दीर्घकाळ सुगंध सोडून गेली(SankarshanViaSpruha) आहेत.
प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड – शबनम न्यूज मीडिया ग्रुपतर्फे आयोजित मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. नागरिक, प्रेक्षक आणि वाचक या तिन्ही स्तरांवरून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संपादिका शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचा यशस्वी समारोप झाला. यावेळी दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात (Metro City Icons) आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, माजी उपमहापौर शैलाजाताई मोरे, माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे, मनिषा ताई पवार, सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख, युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख, आयेशा शेख आदी मान्यवर उपस्थित (Metro City Icons) होते.
आपल्या मनोगतात खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “शबनम न्यूज ही संस्था मागील नऊ वर्षांपासून प्रामाणिक आणि सातत्यपूर्णपणे कार्यरत आहे. त्यांनी पत्रकारितेसह समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव करण्याचा जो उपक्रम तीन वर्षांपासून राबविला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद (Metro City Icons) आहे.”
रोहिणीताई खडसे यांनी सांगितले की, “शबनम न्यूज पत्रकारितेसोबत सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठीही संस्था महत्त्वपूर्ण काम करत आहे. अधिकाधिक महिलांना प्रोत्साहन मिळावे, हा हेतू त्यांच्या उपक्रमातून (Metro City Icons) दिसतो.”

इरफान सय्यद, पैगंबर शेख आणि इम्रान शेख यांनीही शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक करून पुरस्कार्थींचे अभिनंदन (Metro City Icons) केले.
कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात संपादिका शबनम सय्यद यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने केवळ बातमी देण्याचेच नव्हे, तर समाजातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य सातत्याने केले (Metro City Icons) जाते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विशेष कार्य, ज्येष्ठ नागरिक सन्मान, महिला बचत गट सन्मान अशा विविध श्रेणींमध्येही गौरव करण्यात आला.
यंदाच्या पुरस्कार्थ्यांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका मीनल यादव, शिवसेना शहर उपप्रमुख निखिल उमाकांत दळवी, सामाजिक कार्यकर्त्या सीताराम केंद्रे, आदर्श कामगार लक्ष्मण सर्जेराव शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा शांतादेवी जयसिंगराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विनोद सत्यशील वरखडे, सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद, पिंपळे निलखचे शिरीष संभाजीराव साठे, संघर्षातून पुढे आलेले युवक अभिजीत तानाजी कदम, आदर्श कामगार किरण दिनकर बागल, थेरगावचे अनिकेत परशुराम प्रभू, यशस्वी उद्योजक संजय जगताप, जनसेवक मारुती जाधव, पिंपरीतील सक्षम नेतृत्व सुरेश लोंढे, कायदेतज्ञ ॲड. विशाल जाधव, महिला नेतृत्वाची ओळख निर्माण करणाऱ्या आस्मा इम्रान शेख, जैन समाजातील उदयोन्मुख व्यक्तिमत्त्व संदेश गादीया, दीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अश्विनी नामदेव शिंदे, तसेच ए. के. ढवळे नेओबिल्ड कंपनीचे संचालक आबा ढवळे यांचा मेट्रो सिटी आयकॉन अवॉर्ड 2025 ने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन रेहान हुसेन, फरदीन सय्यद, सानिया सय्यद आणि युनूस खातीब यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी तर प्रस्तावना गजाला सय्यद यांनी केली. कार्यक्रमाचे आभार आसिया इनामदार यांनी मानले.
Baba Adhav:ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचा महान दीप विझला
पुणे/नागपूर, दि. ८ —समाजवादी विचारसरणी, मानवतावादी प्रेरणा आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आजीवन झटणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान समाजहितैषी नेता गमावला आहे. हमाल, माथाडी, रिक्षाचालक, फेरीवाले, कागद-काच वेचणारे, बांधकाम कामगार अशा असंघटित मजुरांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे हे संघर्षयोद्धा (Baba Adhav)आज अनंतात विलीन झाले.
पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डॉ. आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “बाबा आढाव यांचे पुण्यासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि असंघटित मजुरांच्या हक्कांचे कट्टर रक्षणकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. माथाडी आणि हातगाडी कामगार कल्याण मंडळ प्रणाली उभारण्यात त्यांचे निर्णायक नेतृत्व राहिले. पुण्यातील शेकडो कामगारांना ओळखपत्र, वेतन संरचना आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या जाण्याने पुणेकरांची अपरिमित(Baba Adhav) हानी झाली आहे.”
मोहोळ यांनी सांगितले की, नगरसेवक, महापौर आणि सार्वजनिक जीवनातील अन्य जबाबदाऱ्या सांभाळताना विविध सामाजिक विषयांवर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतले असून, पुण्याचा खासदार म्हणून मी त्यांना (Baba Adhav)भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरातून व्यक्त केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे, “समाजकारणातील निस्वार्थी वृत्ती, तळमळ आणि अतुलनीय प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले बाबा आढाव यांचे निधन हे अत्यंत दुःखद आहे. श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी अहोरात्र लढणारा महान( Baba Adhav)संघर्षयोद्धा हरपला.”
पुढे अजित पवार म्हणाले, “हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे कार्य त्यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही सामाजिक समता निर्माण करणारी चळवळ उभी करत समाजातील तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हा त्यांचा आजीवन ध्यास होता. सत्यशोधक चळवळीचा विचार ते कृतीतून जगले. संघर्षमय आयुष्य जगत त्यांनी समाजवादाची मूर्त( Baba Adhav) प्रतिमा उभी केली.”
अजित पवार यांनी पुढे नमूद केले की, “त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. त्यांच्या जाण्याने प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान( Baba Adhav)तपस्वी गमावला आहे.”
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील असंघटित मजूर, सामाजिक न्याय, श्रमिक संघटना आणि मानवतावादी चळवळींच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची परंपरा आजही लाखो श्रमिकांच्या हक्कांसाठी( Baba Adhav)लढण्याची प्रेरणा देत राहील.
बाबा आढावांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास अंत्यसंस्कार (Baba Adhav)करण्यात येतील.
