पुणे : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गुरु शुभिता महाजन यांच्या शिष्या आणि प्रतिभावान नृत्यांगना प्रेरणा सहाणे-दीक्षित यांचा “श्यामरंग” हा नृत्याविष्कार रसिकांसाठी सादर होणार आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याच्या सुरेल आणि भावपूर्ण सादरीकरणातून हा कार्यक्रम रंगणार असून कला रसिकांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार (Cultural Program) आहे.
हा कार्यक्रम शनिवार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहून रसिकांनी या अनोख्या नृत्याविष्काराचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले (Cultural Program)आहे.




नंतर ‘गझलसंध्या’ या कार्यक्रमात संगीतकार व गायक कुमार करंदीकर यांनी मराठी गझलांचा सुरेल नजराणा सादर केला. यामध्ये गझल सम्राट सुरेश भट यांच्यासह रमण रणदिवे, निलेश शेंबेकर, संदीप जाधव, प्रशांत पोरे, दिनेश भोसले, अभिजीत काळे, मीना शिंदे, सरोज चौधरी, प्रदीप तळेकर, गणेश भुते आणि अविनाश घोंगटे यांच्या गझलांचा समावेश (Ghazalpushpa Award)होता.
