प्रतिनिधी: भोसरी एमआयडीसी परिसरातील अंबिका पावडर कोटिंग कंपनीमध्ये एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे झालेल्या स्फोटाने शनिवारी (२९ नोव्हेंबर) दुपारी मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर, तर पाच जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार (Bhosari MIDC Blast)सुरू आहेत.
दुपारी पावणे चारच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज, आकाशात उठलेल्या उंच ज्वाळा आणि दाट धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, नेहरूनगर आणि भोसरी उपकेंद्र येथील पथके घटनास्थळी दाखल (Bhosari MIDC Blast)झाली.
अग्निशमन पथकाने परिस्थितीचा आढावा घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. धूर आणि उष्णतेमुळे निर्माण झालेल्या धोक्याची दखल घेत पथकाने सर्व विभागांची पाहणी करून कामगारांना सुरक्षित बाहेर काढले. सुमारे ३० अग्निशामक जवानांनी उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले आणि दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाने कार्यवाही(Bhosari MIDC Blast) केली.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अग्निशमन विभाग आणि संबंधित अधिकारी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाकडून (Bhosari MIDC Blast)करण्यात आले आहे.
जखमी कामगारांची नावे:
-
सुनील कुमार (गंभीर जखमी)
-
दाऊ कुमार
-
सुड्ड जयस्वाल
-
सुरज जाटो
-
राहुल कुमार
-
रोहित कुमार
अधिकाऱ्यांची मते
विजयकुमार खरोटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका:
औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन न केल्यास अशा दुर्घटना घडतात. नियमित तपासणी, उपकरणांची देखभाल आणि कामगारांचे सुरक्षा प्रशिक्षण हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. उद्योगांनी सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले पाहिजे.
व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका:
एलपीजीसारख्या उच्च जोखमीच्या साधनांच्या वापरात नियमित तपासणी आणि देखभालीसोबतच कामगारांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. या घटनेतून भविष्यातील धोके टाळण्यासाठी अधिक जागरूक राहण्याची गरज( Bhosari MIDC Blast)अधोरेखित होते.
ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका:
स्फोटाची माहिती मिळताच आमचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणातील गॅस गळतीमुळे ‘व्हेपर क्लाऊड एक्स्प्लोजन’ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात अनेक एलपीजी सिलेंडर्स असल्यामुळे आणि धूर-उष्णतेमुळे बचावकार्य आव्हानात्मक होते. तरीही प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे आणि पुढील स्फोटाचा धोका टाळणे हे(Bhosari MIDC Blast) आमचे प्रमुख ध्येय होते.
