पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ च्या राज्यस्तरीय अंतिम निकालात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ने १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावून राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच ‘भूमी’ या विषयांतर्गतही महापालिकेने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. या यशाबद्दल महापालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले (Mazi Vasundhara Abhiyan) आहे.
अभियानादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविण्यात आलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे डेस्कटॉप व फिल्ड मूल्यांकन करण्यात आले. दोन्ही टप्प्यांतील एकत्रित गुणांच्या आधारे राज्यातील १४ गटांतील विजेत्यांची निवड शासन मान्यतेनंतर जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरण संरक्षण, हरित उपक्रम, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, ऊर्जा बचत आणि व्यापक जनजागृती मोहिमा यामध्ये प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक (Mazi Vasundhara Abhiyan) मिळविला.
महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, प्लास्टिक निर्मूलन मोहीम, जलसंधारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापनातील सुधारणा, हरित शाळा उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प तसेच नागरिकांच्या सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले. नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला व्यापक यश (Mazi Vasundhara Abhiyan)मिळाले.
राज्यस्तरीय मानांकनामुळे पिंपरी चिंचवडची पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून ओळख अधिक बळकट झाली आहे. आगामी काळात ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियान अधिक व्यापक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबविण्याचा महापालिकेचा संकल्प (Mazi Vasundhara Abhiyan)आहे.
🗣️ प्रतिक्रिया
रवि लांडगे, महापौर :
“माझी वसुंधरा ५.० अभियानातील प्रथम क्रमांक हा महापालिकेच्या सर्व विभागांच्या समन्वयित प्रयत्नांचा आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा परिणाम आहे. पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाला प्राधान्य देत ‘माझी वसुंधरा ६.०’ अंतर्गत अधिक प्रभावी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रकल्प राबविण्याचा आमचा निर्धार (Mazi Vasundhara Abhiyan)आहे.”
श्रावण हर्डीकर, आयुक्त :
“हे यश संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शहर कटिबद्ध असून भविष्यात तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि नवकल्पनांना अधिक चालना दिली (Mazi Vasundhara Abhiyan)जाईल.”
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त :
“हरित प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा आणि ऊर्जा बचतीसंदर्भातील उपक्रमांच्या एकत्रित परिणामामुळे हे यश शक्य झाले. प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वय राखत नियोजनबद्ध पद्धतीने काम (Mazi Vasundhara Abhiyan)केले.”
डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त :
“पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘माझी वसुंधरा ५.०’ अंतर्गत जनजागृती, प्लास्टिक निर्मूलन, जलसंधारण आणि हरित उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Mazi Vasundhara Abhiyan)लाभला.”
