निगडी :निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून, निगडी बस स्टॉप परिसरात पोकलॅण्ड मशीनद्वारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे परिसरात प्रचंड आवाज होत असून, आजूबाजूच्या रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत (Pimpri Nigdi Metro) आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळेत सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांची झोपमोड होत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असल्याने, अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली(Pimpri Nigdi Metro) आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. निगडी बस स्टॉप परिसरात सुरू असलेले रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम रात्री १० वाजेपासून पहाटे ६ वाजेपर्यंत तात्पुरते बंद ठेवण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही, अशी ठाम मागणी त्यांनी केली (Pimpri Nigdi Metro) आहे.
या संदर्भात पोलिस कंट्रोल रूम तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, तातडीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे. नागरिकांच्या शांततेकडे दुर्लक्ष करून काम सुरूच राहिल्यास मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला (Pimpri Nigdi Metro)आहे.
नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून संबंधित यंत्रणांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात (Pimpri Nigdi Metro)आहे.
