चिंचवड : बनावट हार्पिक विक्रीप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे १ लाख ३४ हजार ४२० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला (Fake Harpic Case) आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील कृष्णा हॉटेलजवळ, वाल्हेकरवाडी रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडे Reckitt Benckiser India Private Limited या कंपनीच्या हार्पिक (Harpic) या उत्पादनाच्या नावाने बनावट माल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई (Fake Harpic Case) केली.
या प्रकरणात हिराराम गिरिधरलाल चौधरी (वय ४२, रा. चिंचवडेनगर), विष्णुकुमार खंगाराम चौधरी (वय ३३, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, चिंचवड) तसेच गजेंद्र शेरसिंग जव्हेरी (रा. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Fake Harpic Case) आहे.
या संदर्भात धरमवीर अमरनाथ धल्लोड (वय ४०, रा. शितलानगर, मामुर्डी, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी कंपनीच्या उत्पादनाची बनावट प्रत तयार करून ती विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला (Fake Harpic Case) आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) तसेच कॉपीराइट कायदा १९५७ मधील कलम ५१(ब) आणि ६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधे करत (Fake Harpic Case) आहेत.
