प्रतिनिधी :चिखलीतील वडमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (वय ३७) यांची गोळ्या झाडून झालेल्या खूनप्रकरणी मोठी उलथापालथ झाली आहे. अटक केलेल्या तीन आरोपींच्या चौकशीतून या हत्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचे नाव समोर आले आहे. दिघी पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली असून, या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात (Aalandi Gilbile Murder) खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपशील
१२ नोव्हेंबरच्या सायंकाळी अलंकापूरम रोडवर नितीन गिलबिले हे आपल्या परिचितांसोबत उभे असताना अमित जीवन पठारे (३५) आणि विक्रांत सुरेश ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी गिलबिले यांना कारमध्ये बसवून जवळून डोक्यात गोळी झाडली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि आरोपी तात्काळ पसार )Aalandi Gilbile Murder )झाले.
आरोपींची अटक व पुरावे जप्त
ताम्हिणी घाट परिसरात संशयित वाहन दिसताच पोलिसांनी पाठलाग करून विक्रांत ठाकूर आणि सुमित फुलचंद पटेल (३१) या दोघांना पकडले. गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर कार व मोबाईल जप्त करण्यात आले. मुख्य आरोपी अमित पठारे यालाही दिघी पोलिसांनी अटक केली. तपासात सुमित पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतरही घटनास्थळी फिरताना आढळल्याने त्याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला(Aalandi Gilbile Murder ) आहे.
तापकीर यांच्या नावाने तपासाला नवे वळण
आरोपींच्या चौकशीतून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचा संदर्भ समोर आल्याने तपासाची दिशा बदलली आहे. या खुनामागे त्यांचा आर्थिक, वैयक्तिक की राजकीय वाद होता का, याचा सखोल तपास सुरु (Aalandi Gilbile Murder )आहे.
दिघी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ म्हणाले,
“नितीन गिलबिले खून प्रकरणात किसन महाराज तापकीर यांचा सहभाग आढळला असून त्यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांचा शोध सुरू (Aalandi Gilbile Murder )आहे.”
पोलिसांची शोधमोहीम सुरू
तापकीर यांच्या हालचाली, संपर्कातील व्यक्ती आणि संभाव्य ठिकाणांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच घटनााशी संबंधित पुरावे, शस्त्रांची विल्हेवाट आणि संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्कचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून (Aalandi Gilbile Murder) सुरू आहे.

