पिंपरी (प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड शहरात स्पाच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक मानवी वाहतुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाकड परिसरातील ‘इटर्नल फॅमिली स्पा’ येथे सोमवारी (दि. ०२) सायंकाळी अचानक छापा टाकत देहव्यापाराच्या विळख्यात अडकलेल्या चार पीडित महिलांची सुटका (Wakad Spa Raid)केली.
या कारवाईत स्पाचा व्यवस्थापक अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय ३२, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ रा. आसाम) याला रंगेहाथ अटक करण्यात आली (Wakad Spa Raid)आहे.
स्पामध्ये मसाजच्या नावाखाली बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्ये सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात (Wakad Spa Raid)आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेला हा स्पा अनैतिक व्यवसायाचा अड्डा बनला होता. छाप्यातील पुराव्यांवरून आरोपीविरोधात पिटा कायदा कलम १८ (१) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला(Wakad Spa Raid) आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर पाऊल उचलत
चिंचवड हद्दीतील ‘निक्की लॉज’,
काळेवाडी हद्दीतील ‘लेमन ग्रास थाई स्पा’
सांगवी हद्दीतील ‘औरा थाई स्पा’ या तीन आस्थापना एक वर्षासाठी सील करण्याचे आदेश दिले (Wakad Spa Raid)आहेत.
ही धडक कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते व सहायक निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका (Wakad Spa Raid)बजावली.
स्पाच्या आडून सुरू असलेल्या काळ्या धंद्यांवर पोलिसांचा वचक बसणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत तर अशाच पद्धतीने शहरातील इतर स्पांवरही धडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत (Wakad Spa Raid) आहेत.
