मुंबई | प्रतिनिधी:महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर नेतृत्व असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही. एकीकडे शोक, तर दुसरीकडे सत्ता, संघटन आणि नेतृत्वासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता अधिक तीव्र होताना दिसत (Prafull Patel)आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर ‘पवार’ आडनावाचा चेहरा नको, अशी चर्चा अचानक वेग घेत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली(Prafull Patel) आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एका विधानाचा आधार घेत, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याची अथवा होण्याची जोरदार चर्चा सध्या दिल्लीत आणि मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगली (Prafull Patel)आहे.
अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाचे नेतृत्व कोण सांभाळणार, हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. अनेक मोठी नावे चर्चेत असताना अचानक प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे आल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली (Prafull Patel)आहे.

‘पवार’ विरुद्ध ‘संघटनात्मक चेहरा’?
अजितदादा पवार हे केवळ नेते नव्हते, तर गटाची ओळख होते. त्यांच्या अनुपस्थितीत आता पक्ष घराणेशाहीचा चेहरा ठेवणार की संघटनात्मक अनुभव असलेल्या नेत्याकडे सूत्रे देणार, यावरच खरी लढाई सुरू असल्याचे चित्र( Prafull Patel)आहे.
प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय पातळीवरील अनुभव, केंद्रातील दुवा आणि संघटन कौशल्य लक्षात घेता त्यांचे नाव पुढे येणे योगायोग नाही, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू (Prafull Patel)आहे.
अधिकृत घोषणा केव्हा?
सध्या तरी पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, हे निश्चित. येत्या काही दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत (Prafull Patel)नाही.
राजकीय समीकरणे बदलणार?
जर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची दिशा, धोरण आणि आगामी निवडणुकांची रणनीती पूर्णतः बदलू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात (Prafull Patel)आहे.
एकीकडे अजितदादांच्या आठवणींनी भावनिक वातावरण, तर दुसरीकडे सत्तेसाठी थंड डोक्याने सुरू असलेली राजकीय गणितं—राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा पुढचा अध्याय आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला (Prafull Patel)आहे
