पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक २०२६ : आकुर्डीतील हेडगेवार भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज आकुर्डी येथील हेडगेवार भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला होता. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच या परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला (Pcmc Election 2026)होता.
आजच्या दिवशी जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार आपापले अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती असल्याने हेडगेवार भवन परिसरात उत्साही वातावरण निर्माण(Pcmc Election 2026) झाले होते.
भारतीय जनता पार्टीतर्फे निगडी–आकुर्डी परिसरातून राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला राजेंद्र बाबर, शैलजा मोरे, प्रसाद शेट्टी, उल्हास शेट्टी,कैलास कुटे,आणि विजय शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने (Pcmc Election 2026)उपस्थित होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निलेश शिंदे, धनंजय काळभोर, सरिता साने, प्रीतम शिंदे, मनीषा काळुराम पवार, ,प्रमोद कुटे, वैशाली काळभोर आणि मीनल यादव यांनी आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार (Pcmc Election 2026)शक्तीप्रदर्शन केले.
अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्जांची छाननी प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाणार (Pcmc Election 2026)आहे.
या घडामोडींमुळे निगडी–आकुर्डी परिसरातील लढत अधिक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले असून, प्रमुख पक्षांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचाराला अधिकृत सुरुवात होणार असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापणार (Pcmc Election 2026)आहे.
