पिंपरी-चिंचवड : दापोडी-निगडी ग्रेड सेपरेटर येथे उंचीचा चुकीचा अंदाज आल्याने अवजड कंटेनर पुलाखाली अडकण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या प्रकारामुळे मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत (PCMC Traffic News) झाली.
पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अवजड माल वाहून नेणारा कंटेनर ग्रेड सेपरेटरमधून जात असताना त्याचा वरचा भाग पुलाच्या छताला अडकला. त्यामुळे वाहन पुढे सरकू शकले नाही आणि दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेषतः अवजड वाहने आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे (PCMC Traffic News)लागले.
घ टनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने कंटेनर मागे घेण्याचे काम हाती घेण्यात आले. चाकांमधील हवा कमी करून वाहनाची उंची घटवण्यात आली. अखेर सुमारे नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर कंटेनर बाहेर काढण्यात यश आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात (PCMC Traffic News) आली.
वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनचालकांनी ग्रेड सेपरेटरवरील उंची दर्शविणाऱ्या सूचना फलकांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. अशा घटना टाळण्यासाठी भविष्यात अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत (PCMC Traffic News)आहे.
