(विवेक कुलकर्णी):क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान जोडत भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला तब्बल 96 धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत सर्व अंदाज आणि अफवांना खोटे (Champion India) ठरवले.
“यजमान संघ विश्वचषक जिंकत नाही”, “अहमदाबादचे मैदान भारतासाठी अनुकूल नाही”, “सलग विजय मिळवणे कठीण” अशा अनेक चर्चांना भारतीय संघाने आपल्या कामगिरीने ठोस उत्तर दिले. कर्णधार सूर्याकुमार यादव च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत संपूर्ण देशाला आनंदाच्या लाटेत न्हाऊ (Champion India) घातले.

विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारताने अनेक सामने संघर्ष करत जिंकले होते. पण अंतिम सामन्यात मात्र भारतीय संघाने दणदणीत आणि एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेचा शेवट संस्मरणीय केला.
या स्पर्धेतील आणखी एक खास बाब म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाने शतक झळकावले नाही आणि कोणत्याही गोलंदाजाला पाच विकेट्स मिळाल्या नाहीत. मात्र प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी उचलत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळेच हा विजय अधिक खास मानला जात (Champion India)आहे.
ICC Men’s T20 World Cup च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनेर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर हल्लाबोल करत धावांचा पाऊस (Champion India) पाडला.

अभिषेकची तुफानी सुरुवात
सलामीवीर अभिषेक शर्मा याने टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिले. त्याने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. भारताची पहिली अर्धशतकी भागीदारी केवळ चार षटकांत झाली, तर पॉवरप्लेमध्ये भारताने 6 षटकांत 92 धावा करत दमदार सुरुवात केली.
अभिषेक आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 48 चेंडूत 97 धावांची भागीदारी उभारली. मात्र 52 धावांवर असताना रचिन रवींद्र च्या चेंडूवर अभिषेक यष्टीमागे झेलबाद(Champion India) झाला.
संजू सॅमसनचा विक्रमी डाव
दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख संगम साधत शानदार खेळी केली. त्याने या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत सलग अर्धशतक करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी शाहिद आफ्रिदी आणि विराट कोहली यांनी केली होती.
याशिवाय या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 24 षटकार ठोकण्याचा विक्रमही संजूच्या नावावर जमा (Champion India) झाला.
इशान किशनचा धडाका
ईशान किशन मैदानात आल्यानंतर भारतीय फलंदाजीचा वेग आणखी वाढला. त्याने केवळ 23 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत किवी गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय संघाने 12 षटकांत 150 धावा आणि 15 षटकांत 200 धावा पूर्ण केल्या.
संजू सॅमसन शतकाच्या उंबरठ्यावर असताना 89 धावांवर जेम्स नीशाम च्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्या षटकात निशामने तीन विकेट्स घेत भारताला थोडा आळा घातला. तरीही भारताने 20 षटकांत 255 धावांचा भक्कम डोंगर (Champion India) उभारला.
भारतीय गोलंदाजांचा जबरदस्त मारा
इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. दहाव्या षटकातच किवी संघाचे पाच फलंदाज बाद झाले आणि सामना भारताच्या बाजूने (Champion India) झुकला.
किवी संघाकडून टीम शेइफेर्ट याने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. तसेच सँटनर आणि डॅरील मिचेल यांनी थोडी भागीदारी उभारली, पण ती पराभव टाळण्यासाठी पुरेशी ठरली (Champion India) नाही.
भारतीय गोलंदाजांकडून जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या. त्याला अक्सर पटेल यानेही तीन विकेट्स घेत उत्तम साथ दिली. अखेर न्यूझीलंडचा डाव कोसळला आणि भारताने 96 धावांनी विजय मिळवत विश्वचषक (Champion India) पटकावला.
क्रिकेटवेड्या भारताचा जल्लोष
भारताचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण ठरला. मैदानापासून ते घराघरांत, रस्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तीसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकत भारतीय संघाने केवळ इतिहास घडवला नाही, तर क्रिकेटप्रेमी भारतीयांना अविस्मरणीय आनंदाचा क्षण (Champion India) दिला.
