पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी:मालवाहतूक गाडीचे प्रलंबित भाडे मागण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुण चालकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चिंबळी फाटा परिसरात उघडकीस आली आहे. आरोपींनी चालकाच्या डोक्यात फरशी व लहान गॅस सिलेंडरने प्रहार करत त्याला गंभीर जखमी (Transport Driver Attack) केले.
नेमकी घटना काय?
फिर्यादी शिवानंद महादेव सुरवसे (वय २१, रा. भोसरी) हे चालक म्हणून काम करतात. त्यांनी एका खासगी ट्रान्सपोर्टसाठी मालवाहतूक गाडी चालवली होती. मात्र संबंधित गाडीचे भाडे प्रलंबित असल्याने ते मंगळवारी (दि. २७ जानेवारी) दुपारी चिंबळी फाटा येथील ट्रान्सपोर्ट कार्यालयात पैसे मागण्यासाठी गेले. यावेळी पैसे देण्यावरून शिवानंद आणि कार्यालयात उपस्थित आरोपींमध्ये वाद (Transport Driver Attack)झाला.
सिलेंडर व फरशीने हल्ला
वादाचे रूपांतर काही क्षणातच हिंसक हाणामारीत झाले. संतप्त आरोपींनी शिवानंद यांना बेदम मारहाण केली. एका आरोपीने त्यांच्या डोक्यात लहान गॅस सिलेंडरने जोरदार प्रहार केला, तर दुसऱ्याने फरशीने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शिवानंद यांच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू (Transport Driver Attack)आहेत.
पोलिसांची तत्काळ कारवाई
या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गणेश असणे (वय १९), शिलराजवी हातोले ऊर्फ मोन्या (वय २०) आणि विशाल कांबळे (वय २१) यांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न (IPC 307 / BNS अंतर्गत) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, भोसरी पोलीस पुढील तपास करत (Transport Driver Attack)आहेत.
