प्रतिनिधी :पिंपरीतील साई चौक परिसरात हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून वेटर आणि त्याच्या साथीदारांनी ग्राहकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली (Pimpri Crime News) आहे.
या प्रकरणी आशिष जगन्नाथ वाळुंज (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अब्बास असादुन शेख (वय ३०), मोहम्मद अजीज आशान शेख (वय २१) आणि पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (वय ३०) या तिघांना अटक केली आहे. यापैकी अब्बास आणि अजीज हे मूळचे पश्चिम बंगालचे असून सध्या पिंपरीत वास्तव्यास(Pimpri Crime News) होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी आशिष वाळुंज आणि त्यांचा मित्र मनोज पुंड हे साई चौक परिसरातील ‘हॉटेल रौनक’ येथे जेवणासाठी गेले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली असता, वेटर अजीज याने हॉटेल बंद झाल्याचे सांगत त्यांच्याशी उर्मटपणे वर्तन(Pimpri Crime News) केले.
फिर्यादीने त्याला शांतपणे बोलण्यास सांगितल्यावर आरोपी चिडला आणि त्याने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर हॉटेलबाहेर फिर्यादीवर हल्ला करण्यात आला. आरोपींनी स्वयंपाकघरातील झाऱ्या आणि इतर वस्तूंचा वापर करून बेदम मारहाण केली, ज्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी(Pimpri Crime News) झाले.
हल्ल्यादरम्यान आरोपी अब्बास याने हातातील झाऱ्या हवेत फिरवत ‘कोणी मध्ये आले तर सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले(Pimpri Crime News) होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत (Pimpri Crime News)आहेत.
