पिंपरी (दिनांक : १० डिसेंबर २०२५) – “साहित्य निर्मितीची प्रेरणा मला शाळेतूनच मिळाली!” अशी मनापासूनची कृतज्ञता ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे (VishwasPatilFelicitation)व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, श्रीराम विद्या मंदिर, भोजापूर साहित्य कला संस्कृती मंडळ आणि लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील यांचा नागरी सन्मान करण्यात आला. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा सन्मान संपन्न झाला. भव्य सन्मानचिन्ह व शिवरायांच्या मावळ्यांची पगडी असे या ( VishwasPatilFelicitation )स्वरूप होते.
कार्यक्रमाला त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे, सुदाम भोरे, मुकुंद आवटे, डॉ. रोहिदास आल्हाट, श्रीराम विद्या मंदिरचे अध्यक्ष लालासाहेब जगदाळे, मुख्याध्यापिका संगीता हुंबे, सुनीता भोसले, पुरुषोत्तम सदाफुले आदी मान्यवर (VishwasPatilFelicitation)उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना गुरुजनांच्या संस्कारातून मला साहित्याची प्रेरणा मिळाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावलांजवळ येऊन स्थिरावली आणि तिथून जन्माला आल्या माझ्या महाकादंबऱ्या. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत!” असे ठाम प्रतिपादन त्यांनी (VishwasPatilFelicitation)केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “मोबाइलमध्ये रमलेल्या आजच्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी दर्जेदार साहित्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शालेय संमेलनांतूनच मुलांना साहित्य-कला सादर करण्याची(VishwasPatilFelicitation )पहिली संधी मिळते.”
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविकातून शाखेची साहित्यिक वाटचाल उलगडत, “भोसरी शाखा विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे,” अशी माहिती (VishwasPatilFelicitation)दिली.
कार्यक्रमादरम्यान श्रीराम विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थी संघाच्या स्मरणिकेचे तसेच कवयित्री संजना मगर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात श्रीराम विद्या मंदिरमधील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी नेमकेपणाने सूत्रसंचालन केले तर शंकर गुळवे यांनी(VishwasPatilFelicitation) आभार मानले.
https://youtube.com/watch?v=yp74qdW7ykU&si=RKJxcD2F8zKYu9fm
