पिंपरी, दि. २५ एप्रिल २०२६ : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी आज निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयास सदिच्छा भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच मूल्यसंस्कार देणाऱ्या या संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी (Aditi Tatkare minister) सांगितले.
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पिंपरी येथे आगमन होताच शाळेचे केंद्र प्रमुख मनोज देवळेकर यांनी अदिती तटकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शाळेच्या संपूर्ण परिसराची पाहणी करत विविध उपक्रमांची माहिती घेतली. वर्गखोल्या, क्रीडांगण, प्रयोगशाळा, वाचनालय तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा धावता आढावा त्यांनी (Aditi Tatkare minister)घेतला.
यावेळी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, “शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञान नव्हे, तर संस्कार, शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानप्रबोधिनीसारख्या संस्था समाजासाठी आदर्श ठरत आहेत. येथून घडलेले विद्यार्थी शिक्षण, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत आहेत, ही अभिमानाची बाब (Aditi Tatkare minister)आहे.”
शाळेच्या व्यवस्थापनाची शिस्तबद्ध कार्यपद्धती, विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि संस्थेची प्रगतीशील वाटचाल पाहून समाधान वाटल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती कर्तव्यभावना जागवून जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य ज्ञानप्रबोधिनी सातत्याने करत असल्याचे त्यांनी (Aditi Tatkare minister)सांगितले.
या भेटीदरम्यान शिक्षक, कर्मचारी, पालक प्रतिनिधी तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. नामदार अदिती तटकरे यांच्या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण (Aditi Tatkare minister)झाले.
