प्रतिनिधी :चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्यांच्या प्रोत्साहनाने तसेच मराठी विभागाच्या प्रा. सुरेखा कुंभार यांच्या पुढाकारातून विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली (Pratibha Jr College) होती.
ग्रंथदिंडी ने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथ दिंडीने झाली. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांचे ग्रंथ हातात घेऊन घोषणाबाजी करत परिसरात मराठी भाषेचा जयघोष केला. त्यानंतर सभागृहात सरस्वती वंदना आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात (Pratibha Jr College) आले.
प्रास्ताविक करताना प्रा. सुरेखा कुंभार यांनी मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाची गरज अधोरेखित केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषा ही आपली सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद (Pratibha Jr College)केले.
कविता, नाट्य आणि भारूड सादरीकरण
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रभावी कविता सादरीकरणातून मराठी साहित्याची समृद्ध परंपरा उलगडून दाखवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगाला उपस्थितांची विशेष दाद (Pratibha Jr College)मिळाली.
पारंपरिक लोककलेचा वारसा जपणारे भारूड सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या माध्यमातून मराठी संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात( Pratibha Jr College)आला.
उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा तसेच डॉ. तेजल शहा उपस्थित होते. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार Pratibha Jr Collegeपडला.
