चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांना प्राप्त झालेल्या श्री मंगलमूर्तीच्या पारंपरिक माघी रथयात्रेला सोमवार, दि. १९ रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. चिंचवड येथील श्री मंगलमूर्ती वाड्यातून ही रथयात्रा मोरगावच्या दिशेने (Maghi Rath Yatra)प्रस्थानास निघाली.
सुमारे ५२७ वर्षांपूर्वी श्री मोरया गोसावी महाराजांनी सुरू केलेली ही ऐतिहासिक यात्रा अखंडपणे सुरू असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, भजन-कीर्तन आणि गणरायाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन (Maghi Rath Yatra) निघाला.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, देवराज डहाळे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अपर्णा डोके, अनंत कोन्हाळे, सुरेश भोईर आणि मयुरी शिंदे आदी मान्यवर उपस्थित (Maghi Rath Yatra) होते.
ही माघी रथयात्रा विविध गावांतून मार्गक्रमण करत मोरगाव येथे पोहोचणार असून, पालखी गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी पुन्हा चिंचवड येथे परतणार आहे. यात्रेनिमित्त संपूर्ण मार्गावर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून, भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचे अद्भुत दर्शन घडत (Maghi Rath Yatra)आहे.
