पिंपरी-चिंचवड, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ५२ कोटी रुपयांच्या कथित बोगस उपसूचनांद्वारे आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीने आपला सविस्तर अहवाल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर केला (PCMC Budget Scam) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियमबाह्य पद्धतीने ५२ कोटी रुपयांच्या उपसूचना तयार करून पालिकेच्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात काही नगरसेवक, विभागप्रमुख, अभियंते आणि कंत्राटदार यांचीही मिलीभगत असल्याची चर्चा आहे. तसेच ७० हून अधिक कामांची बिले २० वेगवेगळ्या कंत्राटदारांना मार्च महिन्यात एका रात्रीत अदा करण्यात आल्याचे समोर आले (PCMC Budget Scam)आहे.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सात दिवस चौकशी करून अहवाल तयार केला. यात वित्तीय शिस्त व मंजुरी प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले (PCMC Budget Scam)आहे.
दरम्यान, चौकशी समितीने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केल्याची माहिती समोर येत असून, आता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले(PCMC Budget Scam) आहे.

