प्रतिनिधी:बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला विजय हा केवळ एक झलक असून आगामी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुका अजून बाकी आहेत, असे सूचक वक्तव्य आमदार(MLA Amit Gorkhe) अमित गोरखे यांनी केले.
बिहारमधील विजयाबाबत बोलताना आमदार गोरखे म्हणाले की, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या दृढ विश्वासाचा परिणाम आहे. तळागाळापर्यंत पोहोचलेल्या विविध योजना, महिलांसाठी राबवलेली उपक्रमे आणि मध्यवर्ग तसेच गोरगरिबांसाठी केलेल्या विकासकामांमुळे हा निर्णायक विजय मिळाल्याचे (MLA Amit Gorkhe) त्यांनी सांगितले.
बिहारच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितपणे दिसून येईल, असेही गोरखे म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त (MLA Amit Gorkhe) केला.
