(निगडी, प्रतिनिधी दि 23 जून) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र कार्याने पुण्यभूमी झालेल्या देहू-आळंदी परिसरासह १६ किलोमीटर पंचक्रोशीला राज्य शासनाने अधिकृतपणे ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती निगडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात (Dehu Alandi Santbhumi)आली.
यावेळी संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती संजय मुळे आणि डॉ. अभय टिळक उपस्थित होते. या मागणीसंदर्भातील सविस्तर निवेदन राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी (Dehu Alandi Santbhumi)सांगितले.
पत्रकार परिषदेत देहू आणि आळंदी ही भागवत धर्माची अनुक्रमे कळस आणि पाया असल्याचे नमूद करण्यात आले. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या या दोन तीर्थक्षेत्रांदरम्यानचा १६ किलोमीटर परिसर संत परंपरा, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय तसेच धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असल्याने त्याला **‘संतभूमी’**चा दर्जा देण्याची मागणी करण्यात (Dehu Alandi Santbhumi)आली.
निवेदनात संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, भामचंद्र गड, भंडारा डोंगर, सिद्धबेट, चिखली तसेच इंद्रायणी तीरावरील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आला आहे. या परिसराच्या संवर्धनामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, वारकरी परंपरेचे जतन होईल आणि स्थानिक आर्थिक विकासालाही गती मिळेल, असा दावा करण्यात (Dehu Alandi Santbhumi)आला.
उत्तराखंड राज्याने ‘देवभूमी’ची संकल्पना ज्या धर्तीवर स्वीकारली, त्याच धर्तीवर देहू-आळंदी पंचक्रोशीला ‘संतभूमी’ म्हणून अधिकृत मान्यता देऊन आवश्यक अधिसूचना तातडीने जारी करावी, अशी मागणीही करण्यात (Dehu Alandi Santbhumi)आली.
राजू महाराज ढोरे आणि डॉ. स्वाती संजय मुळे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन शासनाकडे सादर करण्यात आले असून, राज्य सरकारने वारकरी भावनांचा आदर करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात (Dehu Alandi Santbhumi)आली.

