प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील तळवडे एमआयडीसी परिसरात गुरुवारी (२३ एप्रिल) भीषण क्रेन अपघात घडला असून, या घटनेमुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरातील तब्बल ८ हजार ६१० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यामध्ये १ हजार ९१० लघुउद्योगांचा समावेश (MSEDCL Power Cut) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान एक क्रेन महावितरणच्या २२ केव्ही फीडर लाईन णि रोहित्रावर कोसळली. जोरदार धडकेमुळे वीज खांब, तारांसह इतर यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. परिणामी देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनअंतर्गत येणाऱ्या देहूगाव आणि तळवडे या दोन्ही प्रमुख वीजवाहिन्यांचा पुरवठा तातडीने बंद करण्यात (MSEDCL Power Cut) आला.
या घटनेचा सर्वाधिक फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. तळवडे आयटी पार्क आणि मॅन्युफॅक्चरिंग झोनमधील सुमारे १ हजार ९१० उद्योगांचे कामकाज विस्कळीत झाले असून उत्पादन प्रक्रियेलाही मोठा अडथळा निर्माण झाला. त्याचबरोबर ६ हजार ७०० घरगुती ग्राहकांनाही अंधाराचा सामना करावा (MSEDCL Power Cut) लागला.
महावितरणच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. पर्यायी व्यवस्थेद्वारे ७ मेगावॉट वीजभार सुरू करण्यात आला असला, तरी एक्सप्रेस फीडरवरील काही ग्राहकांचा पुरवठा सुरू करण्यात अडचणी येत होत्या. गुरुवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू (MSEDCL Power Cut) होते.
दरम्यान, वीज यंत्रणेचे नुकसान केल्याप्रकरणी महावितरणने संबंधित क्रेन मालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली (MSEDCL Power Cut) आहे.
