(बेलफास्ट, विवेक कुलकर्णी ): टी-२० विश्वविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या भारतीय संघाचा फुगा अखेर आयरलंडने फोडला. दोन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच भारतावर २-० असा दणदणीत विजय मिळवत आयरलंडने इतिहास रचला. हा केवळ ‘व्हाईट वॉश’ नाही, तर भारतीय संघाचा अक्षरशः ‘वाईट वॉश’ (India vs Ireland) ठरला.
पहिल्या सामन्यात भारताला १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या १४८ धावांत गारद व्हावे लागले. तब्बल ३४/३५ धावांच्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तीही फोल ठरली. दुसऱ्या सामन्यात १५५ धावांच्या साध्या वाटणाऱ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली आणि शेवटच्या चेंडूवर अवघ्या एका धावेने पराभव स्वीकारावा(India vs Ireland) लागला.
प्रिन्स यादवचा दमदार पदार्पणाचा ठसा
भारतीय संघ हरला असला तरी पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने ४ षटकांत २२ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेत प्रभावी कामगिरी केली. हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर आणि लियाम मॅकार्थी यांना बाद करत त्याने आयरलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पदार्पणात तीन बळी घेत त्याने विशेष विक्रमही आपल्या नावावर (India vs Ireland)केला.
तिलकचे अर्धशतक… पण खूप संथ!
भारतीय डावात तिलक वर्माने ४६ चेंडूत ५५ धावा करून एकाकी झुंज दिली. मात्र हे अर्धशतक अत्यंत संथ गतीने आले. लक्ष्य फार मोठे नसताना मधल्या षटकांतील मंद फलंदाजीमुळे अखेरचा ताण वाढला आणि भारतावर दबाव निर्माण झाला. त्याच्या खेळीने भारताला आशा दिली, पण सामना जिंकवता आला (India vs Ireland)नाही.
हर्षित राणाची झुंज व्यर्थ
अखेरच्या क्षणी हर्षित राणा याने अवघ्या १० चेंडूत २१ धावांची आक्रमक खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण शेवटच्या षटकातील नाट्यमय घडामोडींमध्ये तो बाद झाला आणि भारताच्या आशाही संपुष्टात आल्या. त्याची धडाकेबाज खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली (India vs Ireland)नाही.
श्रेयस अय्यरचे नेतृत्व प्रश्नचिन्हाखाली
या मालिकेत कर्णधार श्रेयस अय्यर नेतृत्वात आणि फलंदाजीत दोन्ही ठिकाणी प्रभाव पाडू शकला नाही. पहिल्या पराभवानंतर संघात अपेक्षित बदल किंवा रणनीती दिसली नाही. निर्णायक क्षणी नेतृत्वाची छाप उमटली नाही आणि भारताने मालिका (India vs Ireland)गमावली.
नाव मोठं… लक्षण खोटं?
कागदावर भारतीय संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे होती. पण मैदानावर मात्र आयरलंडच्या तरुण आणि जिद्दी खेळाडूंनी त्यांना सर्वच विभागांत मागे टाकले. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, दडपणाखाली फलंदाजी आणि नियोजन या प्रत्येक बाबतीत आयरलंड अधिक सरस (India vs Ireland)ठरला.
भारताकडे स्टार खेळाडू होते, पण आयरलंडकडे जिद्द होती. अखेरीस जिद्दीनेच स्टारडमवर मात (India vs Ireland)केली.
आत्मपरीक्षणाची वेळ
हा पराभव केवळ एका मालिकेचा नाही, तर भारतीय संघासाठी गंभीर इशारा आहे. सलग १२ मालिका जिंकणारा संघ दोन सामन्यांत एकदाही प्रभावी खेळ करू शकला नाही. आगामी मोठ्या स्पर्धांपूर्वी संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि खेळाडूंना कठोर आत्मपरीक्षण करावे (India vs Ireland)लागेल.

अन्यथा ‘विश्वविजेता’ हा किताब फक्त कागदावर राहील आणि मैदानावर अशाच धक्कादायक पराभवांची पुनरावृत्ती होत (India vs Ireland) राहील.

