चिंचवड प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत कस्तुरी मार्केट परिसरातील ५० अनधिकृत दुकानांवर धडक कारवाई केली. ही कारवाई महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशान्वये करण्यात (Kasturi Market)आली.
मार्केटमधील दुकानांनी घेतलेले अनधिकृत साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन तसेच रस्त्यावर उभारलेली लोखंडी पत्रशेड हटविण्यात आली. या अतिक्रमणांमुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत(Kasturi Market) होता.
अतिक्रमण उपायुक्त तथा ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. प्रशासन अधिकारी महादेव बोरे यांनी कारवाईचे नेतृत्व (Kasturi Market)केले.
कारवाईसाठी ३ जेसीबी मशीन, ३ पिंजरा गाड्या, ४३ एमएसएफ जवान आणि ६ मनपा मजूर तैनात करण्यात आले होते. तसेच पारदर्शकतेसाठी संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण करण्यात(Kasturi Market) आले.
महापालिका प्रशासनाने शहरातील इतर भागांतील अनधिकृत शेड व अतिक्रमणांवरही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला (Kasturi Market)आहे.
