Home पुणे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा |

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा |

पुण्यातील बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम, ‘मिशन सिंदूर’ नृत्याविष्कार आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.

by Admin
Spread the love

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षानिमित्त बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वजाला मानवंदना, विद्यार्थ्यांचे संचलन, देशभक्तिपर गीत-नृत्य, स्केटिंग प्रात्यक्षिक, फॅशन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन (Suryadatta Group of Institute )निघाला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, कर्नल (डॉ.) गुरविंदर पाल सिंग (निवृत्त) आणि बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मिशन सिंदूर’वर सादर केलेल्या नृत्याविष्कारातून जवानांच्या शौर्याला मानवंदना (Suryadatta Group of Institute )दिली.

यावेळी डॉ. चोरडिया यांनी युवकांनी शिक्षणासोबत देशभक्ती, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार जोपासून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. अरविंद पवार यांनी देशभक्ती वर्षभर मनात आणि कृतीत जपण्यासह व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार व चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा संदेश दिला. कर्नल सिंग यांनी संविधानिक मूल्ये, राष्ट्रीय सुरक्षा आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व अधोरेखित(Suryadatta Group of Institute ) केले.

विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार (Suryadatta Group of Institute )पडला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00