पुणे, १८ ऑगस्ट : १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हॉकी चंदीगड, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा, हॉकी मध्य प्रदेश आणि हॉकी मणिपूर यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी गटातील अखेरचे सामने पार (Jr Women Hockey Championship) पडले.
हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली हॉकी महाराष्ट्रातर्फे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली(Jr Women Hockey Championship) आहे .
गट ‘अ’मध्ये हॉकी चंदीगडने हॉकी पंजाबचा ३-१ असा पराभव केला. दीक्षा (३३वे मिनिट), रवीना (३४वे) आणि प्रिया चौहान (४६वे) यांनी चंदीगडकडून गोल केले, तर पंजाबकडून जैसमीन कौरने (४०वे) एकमेव गोल केला. या विजयासह चंदीगडने ३ गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले. हॉकी झारखंड ६ गुणांसह अव्वल(Jr Women Hockey Championship) राहिले.
गट ‘ब’मध्ये हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाने हॉकी बंगालचा ६-० असा धुव्वा उडवला. द्रुपती नाईकने दोन, तर अजिता एक्का, एक्का सोनाली, बिनाती मिंझ आणि भोली डोली यांनी प्रत्येकी एक गोल केला. ओडिशाने ३ गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले. हॉकी हरियाणा ६ गुणांसह अव्वल ठरले.
गट ‘ड’मध्ये हॉकी मध्य प्रदेशने हॉकी हिमाचलचा ६-० असा पराभव केला. काजलने तीन गोल करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तन्वी, मिताली शर्मा आणि कुदरत यांनी प्रत्येकी एक गोल केला. मध्य प्रदेशने ६ गुणांसह गटात पहिले स्थान (Jr Women Hockey Championship)पटकावले.
दिवसाच्या अखेरच्या सामन्यात यजमान हॉकी महाराष्ट्राला हॉकी मणिपूरकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला. मणिपूरच्या सल्लू पुख्रंबमने २१वे, ४३वे आणि ४७वे मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. महाराष्ट्राकडून रुबी राठोड (४९वे) आणि तानिष्का शिंदे (५३वे) यांनी गोल केले. या विजयासह मणिपूरने ४ गुणांसह गट ‘क’मध्ये दुसरे स्थान मिळवले. उत्तर प्रदेश हॉकी गोलफरकाच्या आधारे ४ गुणांसह अव्वल (Jr Women Hockey Championship)राहिले.
उपांत्यपूर्व फेरीतील सामने

हॉकी झारखंड वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा
हॉकी मध्य प्रदेश वि. हॉकी मणिपूर
हॉकी हरियाणा वि. हॉकी चंदीगड
उत्तर प्रदेश हॉकी वि. छत्तीसगड हॉकी

