Home राजकारण Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज बीएलओकडे जमा करावेत, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन.

by Admin
Spread the love

पिंपरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ अभियानांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले (Voter List 2026) आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, निर्धारित मुदतीत गणना अर्ज सादर करणाऱ्या पात्र नागरिकांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार (Voter List 2026)आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत बीएलओ घरभेटी देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करत आहेत. शहरातील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी महापालिका प्रशासन विविध स्तरांवर जनजागृती आणि समन्वय करत (Voter List 2026) आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी गणना अर्ज वेळेत भरून संबंधित बीएलओकडे जमा करावा. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्वतःच्या नावाची खात्री करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे अथवा हरकती दाखल कराव्यात. एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद (Voter List 2026) केले.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, शहरात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असून नागरिकांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून गणना अर्ज वेळेत सादर करावेत. ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट (Voter List 2026) केले.

महापालिकेच्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नव्याने मतदार नोंदणी अथवा नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८, तर चुकीच्या अथवा अपात्र नोंदी वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ सादर करता येणार आहे. सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार (Voter List 2026) आहे.

उप आयुक्त सचिन पवार यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांना मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर तपशीलांची खात्री करण्याचे आवाहन केले. आवश्यक असल्यास नमुना ६, ७ किंवा ८ द्वारे विहित कालावधीत अर्ज सादर करून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात, असे त्यांनी (Voter List 2026) सांगितले.

शहरातील कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित बीएलओकडे जमा करावा आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले (Voter List 2026) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00