Home माझं पिंपरी चिंचवड Sathvanitale Gani:साठवणीतले गाणी भाग २ : ‘मै नहीं माखन खायो’मधील कृष्ण-यशोदेच्या वात्सल्याची अविस्मरणीय अनुभूती

Sathvanitale Gani:साठवणीतले गाणी भाग २ : ‘मै नहीं माखन खायो’मधील कृष्ण-यशोदेच्या वात्सल्याची अविस्मरणीय अनुभूती

साठवणीतले गाणी' भाग २ मध्ये 'मै नहीं माखन खायो' या अजरामर भक्तिगीतातून श्रीकृष्ण आणि यशोदा मातेच्या वात्सल्यपूर्ण नात्याचा भावस्पर्शी प्रवास. सूरदासांच्या शब्दांना अनुप जलोटांच्या स्वरांची लाभलेली अमर साथ.

by Admin
Spread the love

(विवेक दिगंबरराव कुलकर्णी):साठवणीतले गाणी :भाग दुसरा 

रसिकजन हो, अदाब…

माझ्या घरी लहानपणापासूनच धार्मिक वातावरण होतं. गावही छोटंसं होतं. त्या काळी आजच्यासारखं फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबचं आभासी जग नव्हतं. लोक एकमेकांना आवर्जून भेटायचे, मनापासून एकमेकांची विचारपूस करायचे. गावात नियमित पोथी-पुराण, कीर्तन, हरिपाठ होत असत. त्यामुळे भक्ती, संस्कार आणि अध्यात्म हे नकळतच आयुष्याचा भाग (Sathvanitale Gani)बनले.

 

याच वातावरणातून पौराणिक कथा ऐकण्याची आणि वाचण्याची गोडी लागली. राम आणि कृष्ण हे माझे आजही अत्यंत आवडते दैवत.राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. आदर्श जीवनाचा सर्वोच्च मानदंड. तर कृष्ण म्हणजे जीवनाचं सर्वात सुंदर आणि वास्तववादी तत्त्वज्ञान. परिस्थितीनुसार जगणं, नाती जपणं, अन्यायाविरुद्ध उभं राहणं, योग्य वेळी कठोर निर्णय घेणं, मित्रासाठी सारथी होणं आणि भक्तासाठी देव होणं… हे सगळं कृष्ण शिकवतो. कृष्ण म्हणजे अर्जुनाचा सखा, द्रौपदीचा रक्षक, सुदाम्याचा जिवलग मित्र आणि प्रसंगी राजकारणालाही धर्माची जोड देणारा अद्वितीय (Sathvanitale Gani) कूटनीतिज्ञ.

 

पण या सर्व कृष्णापेक्षा मला सर्वाधिक भावतो तो… गोकुळातला लोण्याचा चोर, खट्याळ, निष्पाप आणि निरागस कान्हा! कृष्णाचं बालपण म्हणजे वात्सल्याचं, प्रेमाचं आणि खोडकर निरागसतेचं अप्रतिम चित्र. आजच्या भाषेत सांगायचं तर… हॅट्स (Sathvanitale Gani)ऑफ!

 

याच कृष्णलीलांमधील एक अजरामर भजन म्हणजे “मै नहीं माखन खायो.” सूरदासजींच्या अवीट शब्दांना भजनसम्राट अनुप जलोटा यांनी दिलेला स्वर म्हणजे भक्ती, वात्सल्य आणि भावनांचं अक्षरशः (Sathvanitale Gani)अमृत.

 

गोकुळातील गोपिका यशोदा मैय्याकडे कृष्णाच्या खोड्यांची तक्रार घेऊन येतात. “तुझा कान्हा आमचं लोणी खातो, मडकी फोडतो, आम्हाला त्रास देतो,” अशी एकामागून एक तक्रार सुरू होते. आणि समोर उभा असलेला छोटा कृष्ण… आपल्या निष्पाप डोळ्यांनी, गोड चेहऱ्याने प्रत्येक आरोपाचं इतकं निरागस खंडन करतो की, हे दृश्य आपण प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहतो आहोत असंच (Sathvanitale Gani)वाटतं.

 

पण या भजनाचं खरं सौंदर्य केवळ कृष्णाच्या खोड्यांत नाही… तर यशोदा मैय्या आणि कृष्णाच्या नात्यात आहे.एक गोष्ट कायम मनाला स्पर्श करून जाते… कृष्ण हा यशोदा मैय्येच्या उदरातून जन्मलेला नव्हता. तरीही तिने त्याच्यावर जे प्रेम केलं, ते जन्मदात्रीपेक्षाही कमी नव्हतं. मातृत्वाला रक्ताच्या नात्याची गरज नसते, प्रेमाची गरज असते, हे यशोदा मैय्येने संपूर्ण जगाला दाखवून(Sathvanitale Gani) दिलं.

 

भजनात एक क्षण असा येतो, जो प्रत्येक वेळी काळजाचा ठाव घेतो.

 

कृष्ण म्हणतो…

 

“तुने मोहे जानो परायो जानो…”

 

हे शब्द ऐकताना असं वाटतं की, कृष्णाने लोणी चोरलं की नाही, हा प्रश्नच गौण ठरतो. त्या एका वाक्याने मात्र यशोदा मैय्येच्या मातृत्वालाच जणू घाव बसतो. जिच्यासाठी कान्हा म्हणजे तिचा श्वास, तिचं विश्व… तिच्याच प्रेमावर तिच्या लेकराने प्रश्नचिन्ह उभं करावं, यापेक्षा मोठी वेदना आईसाठी (Sathvanitale Gani)कोणती?

 

त्या क्षणी यशोदा मैय्येच्या डोळ्यांत आलेलं पाणी हे रागाचं नसतं… ते मातृत्वाच्या जखमेचं(Sathvanitale Gani) असतं.

 

आणि इथेच कृष्णही बदलतो.

 

आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याचा खट्याळपणा एका क्षणात विरघळून जातो. त्याला जाणवतं की, आपण लोणी चोरून इतकी मोठी चूक केली नाही… पण आईच्या प्रेमालाच नकळत दुखावलं, ही खरी चूक (Sathvanitale Gani)झाली.

 

मग तो अपराधी भावनेने, पश्चात्तापाने अक्षरशः विरघळून जातो आणि कबूल करतो…

 

“मैय्या… मैने ही माखन खायो…”

 

या एका स्वीकारात पराभव नाही… तर प्रेमाचा विजय (Sathvanitale Gani)आहे.

 

एका बाजूला जखमी झालेलं मातृत्व आणि दुसऱ्या बाजूला आईचे अश्रू पाहून वितळलेलं(Sathvanitale Gani) लेकरू…

 

या प्रसंगानंतर अनुप जलोटाजींचा स्वर, सूरदासजींचे शब्द आणि कृष्ण-यशोदा मैय्येचं वात्सल्य… हे सगळं मिळून डोळे कधी ओले होतात, हेच कळत (Sathvanitale Gani)नाही.

 

हे भजन मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा शब्दांचा अर्थ समजण्याचं वय नव्हतं. पण कानांनी एवढंच सांगितलं होतं… की हे काहीतरी विलक्षण आहे. पुढे मोठा झाल्यावर अनुपजींच्या आवाजात ते पुन्हा पुन्हा ऐकलं आणि प्रत्येक वेळी त्याचा नवा अर्थ उमगत(Sathvanitale Gani) गेला.

 

आजही हे भजन ऐकलं की मन पुन्हा बालपणात जातं. आणि शेवटचं कडवं आलं की डोळे नकळत भरून येतात. कारण तिथे फक्त एक भजन राहत नाही… तिथे आई आणि लेकराच्या नात्याचं विश्व उभं (Sathvanitale Gani)राहतं.

 

शब्द, स्वर आणि भावना यांची जादू याहून वेगळी काय असू (Sathvanitale Gani)शकते?

 

काही कलाकृती या फक्त ऐकायच्या नसतात… त्या जगायच्या असतात, अनुभवायच्या असतात. “मै नहीं माखन खायो” हे त्यापैकीच एक अजरामर भक्तिगीत(Sathvanitale Gani) आहे.

 

एकदा निवांत वेळ काढा. डोळे मिटा. अनुप जलोटाजींच्या स्वरात हे भजन (Sathvanitale Gani)ऐका…

कदाचित त्या काही मिनिटांत तुम्हालाही तुमच्यातला बालक भेटेल… आणि यशोदा मैय्येच्या कुशीतला तो खट्याळ, निरागस(Sathvanitale Gani) कान्हाही…

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00