Home माझं पिंपरी चिंचवड Janakirampant Karegaonkar:ज्येष्ठ निवृत्त शिक्षक तथा पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक जानकीरामपंत कारेगावकर यांचे निधन

Janakirampant Karegaonkar:ज्येष्ठ निवृत्त शिक्षक तथा पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक जानकीरामपंत कारेगावकर यांचे निधन

जिल्हा परिषदेचे निवृत्त माध्यमिक शिक्षक व पूर्णवाद परिवाराचे ज्येष्ठ उपासक जानकीरामपंत पंढरीनाथ कारेगावकर यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन. बीड येथे अंत्यसंस्कार.

by Admin
Spread the love

बीड | प्रतिनिधी:गायत्री पुरश्चरणकर्ते, पूर्णवाद परिवारातील ज्येष्ठ उपासक तथा जिल्हा परिषदेचे निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. जानकीरामपंत पंढरीनाथ कारेगावकर (अण्णा) यांचे शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजता वयाच्या ९०व्या वर्षी दुःखद निधन (Janakirampant Karegaonkar)झाले.

 

त्यांच्यावर आज (दि. ११ जुलै) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात (Janakirampant Karegaonkar)आले.

 

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. सेवानिवृत्तीनंतर ते बीड येथे स्थायिक झाले. पूर्णवाद परिवाराचे पूजनीय पारनेरकर महाराज यांचा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्य पूर्णवाद परिवाराच्या आध्यात्मिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांच्या साधी राहणी, अध्यात्मनिष्ठ जीवनशैली आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना समाजात विशेष मान (Janakirampant Karegaonkar)होता.

 

त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.मागील वर्षीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.महाराष्ट्र बँकेचे माजी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर हे त्यांचे चिरंजीव(Janakirampant Karegaonkar) होत.

 

‘माझं पिंपरी चिंचवड’ (majhapimprichinchwad.in) परिवाराच्या वतीने श्री. जानकीरामपंत पंढरीनाथ कारेगावकर (अण्णा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच (Janakirampant Karegaonkar)प्रार्थना. 🙏

🌹भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🌹

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00