Home आरोग्य Dr Suhas Kambale:नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी

Dr Suhas Kambale:नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी

पिंपरी-चिंचवडच्या बालाजीनगर परिसरातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांची डॉ. सुहास कांबळे यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांची नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात (Dr Suhas Kambale)आले.

 

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचणे, अंतर्गत गटारे तुंबणे, ड्रेनेज लाईनमधील अडथळे, नाल्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व ठिकाणांची डॉ. कांबळे यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना (Dr Suhas Kambale)दिल्या.

 

या पाहणी दौऱ्यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील नरोटे, उपअभियंता बाळासाहेब शेटे, रिंकू पिटेकर, विठ्ठल शिंदे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या भागातील विविध नागरी समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यानंतर संबंधित विभागांनी प्रलंबित कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन (Dr Suhas Kambale) दिले.

 

पाहणीदरम्यान अंतर्गत गटारे, ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, नाल्यांची स्थिती तसेच सातत्याने पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची सविस्तर पाहणी करण्यात आली. या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही डॉ. कांबळे यांनी अधिकाऱ्यांना (Dr Suhas Kambale)दिल्या.

 

यावेळी कार्यकारी अभियंता सुनील नरोटे यांनी बालाजीनगर परिसरातील प्रलंबित नागरी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती (Dr Suhas Kambale)दिली.

प्रतिक्रिया

 

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कोणतीही समस्या प्रलंबित राहू देणार नाही. सध्या पावसाने काहीशी उघडीप दिली असल्याने पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व मूलभूत सुविधांनी युक्त परिसर उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राधान्य आहे.”

 

— डॉ. सुहास कांबळे

नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य, पिंपरी-चिंचवड (Dr Suhas Kambale)महानगरपालिका.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00