Home माझं पिंपरी चिंचवड Kudalwadi Action:कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत आरपीआयचा निषेध; पुनर्बांधणीची मागणी

Kudalwadi Action:कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत आरपीआयचा निषेध; पुनर्बांधणीची मागणी

कुदळवाडी परिसरातील मंदिर आणि मशिदीवरील कारवाईचा आरपीआयचे राज्याध्यक्ष अजीज भाई शेख यांनी निषेध केला असून धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी व चौकशीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १२ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी परिसरातील मंदिर आणि मशिदीवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) चे राज्याध्यक्ष अजीज भाई शेख यांनी तीव्र निषेध करत धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत (Kudalwadi Action) होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस बाबा सरोदे, गजानन घुगे आदी उपस्थित होते.
अजीज भाई शेख म्हणाले की, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता आणि धार्मिक भावना विचारात न घेता कारवाई केली. धार्मिक स्थळी बूट-चपला घालून प्रवेश करण्यात आल्याने पावित्र्य भंग झाल्याचा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी मुस्लिम समाज मशिदीत नमाज पठणासाठी जातो, तर शनिवारी हनुमान मंदिरात पूजा-अर्चा केली जाते. अशा संवेदनशील काळात कारवाई केल्याने दोन समाजांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी (Kudalwadi Action)सांगितले.

ते पुढे म्हणाले की, संबंधित धार्मिक स्थळे विकासकामात अथवा रस्त्याच्या अडथळ्यात येत असतील, तर प्रशासनाने स्थानिकांना विश्वासात घेऊन चर्चा करायला हवी होती. “आम्ही स्वतःहून सहकार्य करून जागा समायोजित करून दिली असती. मात्र, कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली अचानक पाडकाम करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” अशी टीका त्यांनी केली.
महापालिकेने पाडलेली धार्मिक स्थळे स्वखर्चाने पुन्हा उभारावीत, तसेच या कारवाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. कुदळवाडीतील कारवाईमुळे अनेक गोरगरीब व्यावसायिक बेरोजगार झाल्याचे सांगत त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी (Kudalwadi Action) केली.

काही दिवसांपूर्वी बांगलादेशी रोहिंग्या मुस्लीमांच्या नावाखाली परिसरात कारवाई करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणताही बांगलादेशी नागरिक आढळून आलेला नाही, असा दावा त्यांनी केला. विकास आराखड्यावरील हजारो हरकतींचा निकाल आयुक्तांनी लवकरात लवकर लावावा, अशी मागणीही त्यांनी (Kudalwadi Action) केली.

“संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही या अन्यायाविरोधात लढा देणार आहोत. न्याय मिळेपर्यंत शांततामय मार्गाने आंदोलन सुरू राहील,” असे सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनाही निवेदन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट (Kudalwadi Action) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00