Home माझं पिंपरी चिंचवड RSS Tribute Ambedkar :पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; RSS कडून अभिवादन व सामाजिक उपक्रम

RSS Tribute Ambedkar :पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; RSS कडून अभिवादन व सामाजिक उपक्रम

पिंपरी चौकातील भिमसृष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा आणि समरसता गतिविधीतर्फे अभिवादन करण्यात आले. पाणपोई, वही-पेन संकलन असे सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.

by Admin
Spread the love

पिंपरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा आणि समरसता गतिविधी यांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) सकाळी ७.३० वाजता पिंपरी चौकातील भिमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात (RSS Tribute Ambedkar) आले.

 

यानंतर स्मारक परिसरातील संविधान उद्देशिकेला अभिवादन करून भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचा निर्धार करण्यात (RSS Tribute Ambedkar) आला.

 

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, हेमंत हरहरे, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, विलास लांडगे, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, वेणु साबळे, डॉ. धनंजय भिसे, सोपान कुलकर्णी यांच्यासह शहरातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित (RSS Tribute Ambedkar) होते .

 

दरम्यान, समरसता गतिविधीतर्फे पाणपोई, वही-पेन संकलन असे विविध उपक्रमही राबविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा. स्व. संघाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्याने, वही-पेन संकलन आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्व. तात्या बापट स्मृती समितीच्या वतीने पाणपोईची सोय करण्यात आली. कोरोना काळाचा अपवाद वगळता मागील ३० वर्षांपासून ही सेवा अखंड सुरू असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी(RSS Tribute Ambedkar) दिली.

 

‘एक वही, एक पेन’ अभियानांतर्गत संकलित करण्यात आलेल्या वह्या व पेन ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी भारतीय बौद्धजन विकास समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी स्व. तात्या बापट स्मृती समिती व भारतीय बौद्धजन विकास समितीचे कार्यकर्ते उपस्थित(RSS Tribute Ambedkar) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00