पिंपरी (१५ मार्च २०२६) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२५चा उत्साहपूर्ण प्रारंभ शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी करण्यात (Pimpri Granthotsav) आला.
भैरवनाथ चौक, पिंपरी वाघेरे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून पिंपरी कॉलनीतील आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय या महोत्सव स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नगरसेविका प्रियांका कुदळे, नगरसेविका निकिता यादव, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, आर्य समाजच्या नलिनी देशपांडे आणि पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तसेच ग्रंथपूजन करण्यात आले आणि त्यानंतर ग्रंथदिंडी मार्गस्थ (Pimpri Granthotsav) झाली.
या ग्रंथदिंडीत विद्यानिकेतन, आर्य विद्यामंदिर, आर्य वाणिज्य महाविद्यालय, बी.टी. मेमोरियल माध्यमिक विद्यालय, जयहिंद विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय आणि सिक्कीबाई धर्माणी विद्यालय या विविध शाळांमधील सुमारे तीनशे विद्यार्थी शालेय गणवेशासह पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाले होते. तसेच शिक्षकवृंद आणि पुणे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल यांनीही उत्साहाने सहभाग (Pimpri Granthotsav)नोंदविला.
ढोल-ताशा पथक आणि विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाच्या तालावर विद्यार्थी ग्रंथांचे महत्त्व आणि वाचन संस्कृती अधोरेखित करणारे फलक हातात घेऊन ‘जय भवानी – जय शिवाजी’ अशा प्रेरणादायी घोषणांनी परिसर दुमदुमून टाकत(Pimpri Granthotsav) होते.
ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सत्रानंतर डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी ‘लोकमाता ते राजमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रजेवर पुत्रवत प्रेम आणि न्यायनिष्ठ प्रशासन हेच अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे बलस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. चौंडीतील एका साध्या कुटुंबातील मुलगी ते राजमाता आणि पुढे लोकमाता असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास विविध ऐतिहासिक संदर्भांसह त्यांनी उलगडून (Pimpri Granthotsav)सांगितला.
‘गझल : वाटचाल उर्दूतून मराठीकडे’ या विषयावर ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी गझलेचा प्रवास प्रभावीपणे मांडला. माधव ज्युलियन यांनी उर्दू गझल मराठीत आणली आणि गझलसम्राट सुरेश भट यांनी तिला मराठीत खऱ्या अर्थाने लोकप्रिय केले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःच्या ‘पालखी’ या गझलेतून गझलेचा संतसाहित्याशी असलेला संबंध स्पष्ट केला; तर ‘माझी मुलगी’ या गझलेच्या सादरीकरणातून उपस्थितांना भावूक (Pimpri Granthotsav)केले.
यावेळी श्रेया गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही मान्यवरांच्या हस्ते पंचवीस वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दीक्षित यांनी केले, तर आभारप्रदर्शनही त्यांनीच(Pimpri Granthotsav) केले.
