Home प्रेरणा / यशकथा PCMC Disability Day:पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

PCMC Disability Day:पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

नवीन योजनांचा शुभारंभ, दिव्यांगांना सन्मानाचे व्यासपीठ

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने जागतिक दिव्यांग दिन (World Disability Day) उत्साहात साजरा करत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच विविध उपक्रम आणि आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत (PCMC Disability Day) आणली.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या सबलीकरणासाठी सुरू होणाऱ्या नव्या योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात (PCMC Disability Day)आली.

या सोहळ्याला दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख (माजी आयएएस), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांच्यासह अनेक मान्यव(PCMC Disability Day)उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी उत्साहाने आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. हा दिवस केवळ योजनांच्या उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, समावेशक समाजनिर्मितीचा आणि दिव्यांग बांधवांच्या अदम्य सामर्थ्याचा सन्मान करण्याचा होता. कार्यक्रमाला दिव्यांग बांधव, त्यांचे पालक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना सन्मान, प्रोत्साहन आणि सक्षमीकरणाची नवी दिशा मिळाल्याचे(PCMC Disability Day)मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00