Home माझं पिंपरी चिंचवड Vivek Mitra Mandal:विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

Vivek Mitra Mandal:विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

निगडी प्राधिकरणातील विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव अथर्वशीर्ष पठण, वेशभूषा, नृत्य, गायन, रॅम्प वॉक आणि अंताक्षरीसह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.

by Admin
Spread the love

(निगडी प्राधिकरण): निगडी प्राधिकरणातील विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते तसेच मनशक्ती केंद्राचे संचालक संजीव कुमार पाटील यांच्या हस्ते (Vivek Mitra Mandal)झाले.

 

गणेशोत्सवाच्या सप्ताहभराच्या कालावधीत अथर्वशीर्ष पठण, लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा, श्री. सारंग चिंचणीकर यांचे नाट्य अभिवाचन, खाऊ गल्ली यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच सोलो नृत्य, ग्रुप डान्स आणि गायन स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद (Vivek Mitra Mandal)मिळाला.

 

युवक-युवती तसेच महिला आणि पुरुषांसाठी आयोजित रॅम्प Stamp उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अंताक्षरी स्पर्धेनंतर उद्योजक महेश खेडकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ(Vivek Mitra Mandal) झाला.

 

विशेष म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे श्री. संभाजी सूर्यवंशी यांनी मंडळाच्या गणेशोत्सवास भेट देऊन उपक्रमांची पाहणी(Vivek Mitra Mandal) केली.

 

उत्सवाचे संयोजन अध्यक्ष निलेश कुंजीर, उपाध्यक्ष दिनकर मालुसरे, कार्याध्यक्ष स्वप्निल भागवत, सचिव रोहित खत्री आणि कोषाध्यक्ष विजय गुरटे यांनी(Vivek Mitra Mandal) केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00