15
चिंचवडगाव | ६ सप्टेंबर २०२६ : चिंचवडगावातील बिजलीनगर येथील महापारेषण केंद्रात रविवारी अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला असून, केंद्रातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना दिसून (Bijli Nagar Explosion)आले.
या घटनेमुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महापारेषणचे अधिकारी व तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बिघाड दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू (Bijli Nagar Explosion)आहेत.
स्फोट नेमका कोणत्या उपकरणात झाला आणि त्याचे कारण काय, तसेच वीजपुरवठा पूर्णपणे कधी सुरळीत होणार, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली(Bijli Nagar Explosion) नाही.
