Home गुन्हे Fake CEO Scam :बनावट सीईओच्या WhatsApp वरून २.२० कोटींची फसवणूक; तिघांना अटक

Fake CEO Scam :बनावट सीईओच्या WhatsApp वरून २.२० कोटींची फसवणूक; तिघांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट सीईओच्या WhatsApp अकाउंटद्वारे कंपनीची २.२० कोटींची फसवणूक. ‘बॉस स्कॅम’प्रकरणी सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): कंपनीच्या सीईओच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून कंपनीच्या खात्यातून तब्बल २ कोटी २० लाख रुपये वळवून घेणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. ‘बॉस स्कॅम’च्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून, आरोपींनी रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळविल्याचे तपासात निष्पन्न झाले (Fake CEO Scam)आहे.

 

या प्रकरणातील फिर्यादी हे ऑटो शोरूमचे मालक आहेत. १४ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीतील अकाउंट एक्झिक्युटिव्हला एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश आला. संबंधित अकाउंटच्या डीपीवर कंपनीच्या मालकाचा फोटो व नाव असल्याने तो क्रमांक मालकांचाच असल्याचा त्याचा समज झाला. त्यानंतर या क्रमांकावरून विविध बँक खात्यांची माहिती देत त्यामध्ये पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार एकूण २ कोटी २० लाख रुपये विविध खात्यांमध्ये पाठविण्यात (Fake CEO Scam)आले.

 

मात्र, पैशांची मागणी सातत्याने वाढत असल्याने अकाउंट एक्झिक्युटिव्हला संशय आला. त्याने कंपनीच्या मालकाशी थेट संपर्क साधून खात्री केली असता, त्यांच्या नावाने व छायाचित्राचा वापर करून बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार केल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला (Fake CEO Scam)आहे.

 

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास (Fake CEO Scam)केला.

 

तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम जमा झालेल्या बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर ते खाते संचय पराग चव्हाण (वय २०, रा. डोंबिवली पूर्व, मुंबई) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून रमेश कुमार शंकरलालजी पुनिया (वय २४, सध्या रा. पनवेल) आणि प्रकाश गोरधनराम पंवार (वय २०, सध्या रा. पनवेल, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) यांची माहिती(Fake CEO Scam) मिळाली.

 

पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून पाच बँक खाती शोधून काढली. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीच्या रकमांच्या व्यवहारासाठी केल्याचे समोर आले. त्यातील एका खात्यात जमा झालेल्या रकमेतून काही पैसे चेक आणि एटीएमद्वारे काढण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न (Fake CEO Scam)झाले.

 

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रमेश पुनिया आणि प्रकाश पंवार यांचा पनवेल परिसरात शोध घेण्यात आला. दोघे गॅस दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढून दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विविध बँक खाती उपलब्ध करून देत ती सायबर फसवणुकीच्या रकमांच्या व्यवहारासाठी वापरल्याचे निष्पन्न (Fake CEO Scam)झाले.

 

या प्रकरणात तिघांचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत (Fake CEO Scam)आहेत.

 

बनावट व्हॉट्सॲप अकाउंटपासून सावध राहण्याचे आवाहन

 

कंपन्यांचे मालक, सीईओ, एम.डी. किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून व्यावसायिक व्यवहाराच्या नावाखाली पैसे पाठविण्यास सांगून फसवणूक केली जात असल्याचे सायबर पोलिसांनी (Fake CEO Scam)सांगितले.

 

सायबर गुन्हेगार झिप किंवा एपीके फाइलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे व्हॉट्सॲप हॅक करून त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधतात. त्यामुळे कोणत्याही खात्यावर मोठी रक्कम पाठविण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट फोनवर संपर्क साधून खात्री करावी, त्यानंतरच आर्थिक व्यवहार करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00