पिंपरी : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित-दिग्दर्शित ‘जाणता राजा’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रयोग निगडी प्राधिकरण सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर शुक्रवार, १ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता सादर होणार (Janata Raja) आहे.
या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शौर्यगाथा, स्वराज्य स्थापना आणि मराठी अस्मितेचा अभिमान प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे. नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, घोडे-हत्ती आणि शेकडो कलाकारांच्या सहभागामुळे हा प्रयोग विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रवेश विनामूल्य असून, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली (Janata Raja)दिली .





नंतर ‘गझलसंध्या’ या कार्यक्रमात संगीतकार व गायक कुमार करंदीकर यांनी मराठी गझलांचा सुरेल नजराणा सादर केला. यामध्ये गझल सम्राट सुरेश भट यांच्यासह रमण रणदिवे, निलेश शेंबेकर, संदीप जाधव, प्रशांत पोरे, दिनेश भोसले, अभिजीत काळे, मीना शिंदे, सरोज चौधरी, प्रदीप तळेकर, गणेश भुते आणि अविनाश घोंगटे यांच्या गझलांचा समावेश (Ghazalpushpa Award)होता.