(पिंपरी, प्रतिनिधी दि. ४) : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले (Ravi Landge) आहेत.
महापौरांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी साचणारी ठिकाणे, नाले, सबवे, पूरप्रवण भाग, धोकादायक झाडे, जीर्ण संरचना, रस्त्यांची स्थिती तसेच आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती घेऊन आवश्यक सूचना (Ravi Landge)दिल्या.
क्षेत्रीय अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, उघडे मॅनहोल, धोकादायक झाडे, विद्युत धोक्याची ठिकाणे आणि पाणी साचणाऱ्या भागांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. तक्रारींची वाट न पाहता संभाव्य धोके ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर (Ravi Landge) दिला.
नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून किंवा उघड्या नाल्यांजवळ जाणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या नियंत्रण कक्ष किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही महापौरांनी(Ravi Landge) केले.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “नागरिकांच्या जीवापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून संभाव्य धोके दूर करावेत. सुरक्षित पिंपरी-चिंचवड हेच आपल्या सर्वांचे सामूहिक उत्तरदायित्व (Ravi Landge) आहे.


