चिंचवड (पुणे) :नववर्ष स्वागताच्या नावाखाली वाढत चाललेले मद्यपान, धिंगाणा, अपघात, ध्वनीप्रदूषण आणि भारतीय संस्कृतीला तडा देणारे प्रकार थांबवण्यासाठी डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य यांनी एक प्रेरणादायी आणि समाजहिताचा वेगळा मार्ग निवडला आहे. श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड यांच्या माध्यमातून त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रक्तदान शिबीर आयोजित करून समाजासमोर आदर्श (Blood Donation Camp )ठेवला आहे.
२०२५ भर रक्तदान चळवळीचा ध्यास
डॉ. अविनाश वैद्य आणि त्यांच्या सहचारिणी डॉ. सौ. मनाली अविनाश वैद्य यांनी वर्ष २०२५ मध्ये विविध निमित्ताने अनेक रक्तदान शिबिरांचे नियोजन करून शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावला. प्रत्येक रक्तदाता आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली (Blood Donation Camp )आहे.
नववर्षाचे स्वागत संस्कृती आणि सेवेतून
“३१ डिसेंबरची रात्र दारू, बेफाम वाहनचालना आणि दिखाऊ पार्टीसाठी न वापरता समाजासाठी काहीतरी विधायक करायला हवे,” हा विचार डॉ. वैद्य यांनी मांडला. त्यातूनच सायंकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले( Blood Donation Camp) आहे.
रक्तदानासोबत संस्कारांची जपणूक या उपक्रमात केवळ रक्तदानच नव्हे, तर कोजागिरी पौर्णिमेप्रमाणे मसाला दूध वाटप,स्वातंत्र्य दिनाची आठवण करून देणारी जिलबी,मध्यरात्री श्री गणेश आरती,आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना,असा संस्कृतीचा जागर करणारा कार्यक्रम ठेवण्यात आला (Blood Donation Camp) आहे.
डॉ. वैद्य यांचे सर्वसमावेशक आवाहन
टाय-टोपीवाले असोत किंवा साधे नागरिक, स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी, कामगार, आस्तिक-नास्तिक – समाजातील प्रत्येक घटकासाठी हे रक्तदान शिबीर खुले आहे, असे डॉ. अविनाश वैद्य यांनी स्पष्ट (Blood Donation Camp )केले.
“हे वाचणाऱ्या प्रत्येकाने किमान एक रक्तदाता सोबत आणावा,” ही त्यांची भावनिक विनंती आहे.
संस्था–संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन
डॉ. वैद्य यांनी सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक, अध्यात्मिक संस्था, व्यायाम मंडळे, योगवर्ग, हास्यक्लब यांनाही सामूहिक सहभागासाठी आवाहन केले आहे. पुण्यासह तळेगाव, दौंड, नगर, नाशिक, सोलापूर आदी बाहेरगावच्या नागरिकांनाही आत्मीय निमंत्रण देण्यात (Blood Donation Camp )आले आहे.
स्थळ व संपर्क
स्थळ : पु. ना. गाडगीळ सराफ, अमित सोसायटी शेजारी,
चाफेकर चौक, चिंचवड गाव, पुणे – ४११०३४
संपर्क :
🔹 डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य – 9579225298
🔹 डॉ. सौ. मनाली अविनाश वैद्य – 9420863920
🔹 सौ. आशाताई पात्रुडकर – 9404830160
समाजाला सकारात्मक दिशा देणारा उपक्रम
डॉ. अविनाश वैद्य यांचा हा उपक्रम नववर्ष साजरे करण्याची नवी, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख दिशा दाखवणारा ठरत असून, “उत्सव म्हणजे उधळपट्टी नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देणे,” हा ठोस (Blood Donation Camp) संदेश देतो.
