प्रतिनिधी :चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग (Pragyanbodhini School Chikhali)नोंदवला.
या स्नेहसंमेलनासाठी तुकाराम महाराजांचे वंशज व देहू देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे आणि शिवाजी महाराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेचे संस्थापक सचिव यादवेंद्र जोशी, संस्थेचे अध्यक्ष मदनलाल कांकरिया, विश्वस्त मकरंद बापट, यशवंत लिमये, शरयू जोशी, ज्ञानेश्वर म्हेत्रे, केशव महाराज, पुरुषोत्तम महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला सुमारे १२०० पालक उपस्थित(Pragyanbodhini School Chikhali) होते.
यंदाच्या स्नेहसंमेलनाचा मुख्य विषय “संत चरित्र दर्शन” असा होता. कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर संतांच्या अभंगांवर आधारित विविध नृत्यरचना सादर करण्यात आल्या. संतांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग विद्यार्थ्यांनी नाट्यरूपात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एकनाथ महाराजांचे भारुड आणि वासुदेवांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांनी सुमारे वीसहून अधिक अभंगांचे सादरीकरण केले. संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले अभंग सादरीकरण हा कार्यक्रमाचा कळस ठरला. शेवटी पालखी सोहळ्याने संपूर्ण सभागृह भक्तीरसात न्हाल्याचे चित्र दिसून(Pragyanbodhini School Chikhali) आले.
यावेळी माणिक महाराज मोरे म्हणाले, “आज आपण जणू पंढरीच्या वाळवंटात एकत्र जमलो आहोत, असेच वाटत होते. संतांचे अभंग व अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. भक्तीत रममान झाल्यास जीवन किती सुंदर होऊ शकते, याची जाणीव आज झाली.” त्यांनी सर्व शिक्षक व नृत्यदिग्दर्शकांचे विशेष कौतुक(Pragyanbodhini School Chikhali) केले.
ते पुढे म्हणाले की, तुकाराम महाराजांनी वारीला व्यापक स्वरूप दिले आणि समतेचा महामंत्र दिला. तपोनिधी नारायण महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह वारीची सुरुवात केली. १६८५ ते १८३२ या काळात पंढरपूरला फक्त एकच पालखी जात होती, अशी ऐतिहासिक माहितीही त्यांनी(Pragyanbodhini School Chikhali) दिली.
विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, भक्तीपरंपरेचे सादरीकरण अत्यंत प्रभावी झाले असून आजच्या तरुण पिढीला भक्तिमार्गाची नितांत गरज आहे. संतविचारांशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे संत चरित्राचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुरुषोत्तम महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त(Pragyanbodhini School Chikhali) केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य अपर्णा गोवंडे यांनी करून दिला. रोहिणी खोत व राजेंद्र घोळवे यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख नीता शिवतारे, चारुता जोशी तसेच सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम (Pragyanbodhini School Chikhali)घेतले.
