पिंपरी चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहराच्या न्यायालयीन इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व अभिमानास्पद ठरला. शहराला दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचे हक्काचे “जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय” प्राप्त झाले असून, मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे अत्यंत सन्माननीय वातावरणात व मोठ्या उत्साहात या न्यायालयाचे लोकार्पण करण्यात (PCMC District Court) आले.
या न्यायालयाचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री. संदीप मारणे व मा. न्यायमूर्ती श्री. आरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. एम. के. महाजन तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती (PCMC District Court) होती.
कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे चेअरमन ॲड. हर्षद निंबाळकर, सदस्य ॲड. उदय वारंजीकर, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. अहमद खान पठाण, ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख यांच्यासह बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी, न्यायव्यवस्थेतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात(PCMC District Court) आली.
पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक, व्यापारी व लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहरासाठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची गरज अनेक वर्षांपासून प्रकर्षाने जाणवत होती. आज या न्यायालयाच्या स्थापनेमुळे शहरातील न्यायप्रक्रिया अधिक जलद, सुलभ, परिणामकारक व लोकाभिमुख होण्याचा मार्ग मोकळा झाला(PCMC District Court) आहे.
या सत्र न्यायालयामुळे आता नागरिकांना न्यायासाठी पुणे येथील न्यायालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत, आर्थिक दिलासा आणि मानसिक ताणात घट होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठीही कामकाज अधिक सुसूत्र, कार्यक्षम व सुव्यवस्थित होणार(PCMC District Court) आहे.
यावेळी बोलताना मा. न्यायमूर्ती श्री. संदीप मारणे यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण व प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात स्वतंत्र मोटार वाहन न्यायालय (Motor Vehicle Court) व कौटुंबिक न्यायालय (Family Court) स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही लवकरच करण्यात(PCMC District Court) येईल.”
पिंपरी-चिंचवड हे राज्यातील अग्रगण्य औद्योगिक शहरांपैकी एक असून येथे औद्योगिक, दिवाणी, फौजदारी व श्रमविषयक प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना न्यायदान प्रक्रियेला नवी गती देणारी ठरणार असून न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी(PCMC District Court) ठरेल.
मोरवाडी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश म्हणून श्रीमती एस. एस. नायर, तर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) म्हणून श्री. डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली (PCMC District Court)आहे.
ही केवळ प्रशासकीय घटना नसून पिंपरी-चिंचवड शहराच्या न्यायालयीन हक्काचा विजय आहे. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, पोलीस प्रशासन, वकील बंधू-भगिनी व जागरूक नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच हा ऐतिहासिक टप्पा साकार झाला(PCMC District Court) आहे.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी शहरातील पाचही आमदारांचे सहकार्याबद्दल आभार मानले, तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. महाजन यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी दिलेल्या सहकार्याचे विशेष कौतुक(PCMC District Court) केले.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदुम, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. संकेत सरोदे, ॲड. विकास शर्मा, ॲड. मानसी उदासी यांनी केले. सूत्रसंचालन न्यायाधीश महाडिक साहेब व औटी साहेब यांनी केले, तर नव्याने पदभार स्वीकारलेल्या जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांनी आभार (PCMC District Court)मानले.
यावेळी बोलताना ॲड. उमेश राम खंदारे (सचिव, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन) म्हणाले,
“जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. आज तो प्रत्यक्षात उतरला असून, हे उद्घाटन पिंपरी-चिंचवडच्या न्यायव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरेल.”
