प्रतिनिधी :चिंचवड परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याला भरधाव आरएमसी मिक्सर डंपरने मागून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबाचा आधार हरपला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात (Student Accident) आहे.
चिंचवड परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा आरएमसी मिक्सर डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू (Student Accident) झाला.
फारुक शकील तांबोळी (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक निवृत्ती उद्धव गिरी (वय ३९, रा. पद्मावती रोड, आळंदी, मूळ रा. जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतले (Student Accident)आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुक हा चिंचवडेनगर येथील शिवशाही कॉलनी, भुलेश्वर मंदिराजवळ कुटुंबासह राहत होता. त्याचे वडील शकील आदम तांबोळी (वय ४५) हे एका खासगी कंपनीत काम करतात. आई रिझवाना तांबोळी (वय ३५) आणि धाकटा भाऊ जोहान (वय ४) असा त्यांचा परिवार आहे. अभ्यासू, शांत आणि नम्र स्वभावामुळे फारुक परिसरात सर्वांचा लाडका(Student Accident) होता.
फारुक हा पिंपरी येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल (काळभोरनगर) येथे दहावीच्या वर्गात शिकत होता. यंदा बोर्डाची परीक्षा असल्यामुळे तो अभ्यासात विशेष लक्ष देत होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो सकाळी आठ वाजता सायकलवरून शाळेत गेला होता. दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर तो सायकलवरून घरी निघाला(Student Accident) होता.
दरम्यान, साई कॅफे चौक (प्रेमलोक पार्क) येथून तो जात असताना खंडोबा माळ चौकाकडून चापेकर चौकाच्या दिशेने येणाऱ्या भरधाव आरएमसी मिक्सर डंपरने त्याच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की फारुक सायकलसह काही अंतर डंपरसोबत फरफटत गेला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू (Student Accident)झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घरात आई मुलाची वाट पाहत होती, मात्र काही मिनिटांत आलेल्या फोन कॉलने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका क्षणात हसतखेळत असलेल्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त(Student Accident) झाले.
प्राथमिक माहितीनुसार अपघातावेळी डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू (Student Accident)आहे.
दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत (Student Accident)आहे.
