प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहरात प्रचंड गडबड उडाली. मंगळवारी (३० डिसेंबर) अवघ्या एका दिवसात तब्बल १ हजार ४२१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आठही क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी (PCMC Election)पाहायला मिळाली.
निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत एकूण १ हजार ९९५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले (PCMC Election)आहे.
महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून एबी फॉर्मचे वितरण झाल्याने अर्ज व एबी फॉर्म सादर करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली (PCMC Election)होती.
विशेष म्हणजे, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, शेवटच्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. काही उमेदवारांचे एबी फॉर्म वेळेत स्वीकारले गेले नसल्याने संबंधित कार्यालयांमध्ये वादावादीचे प्रसंगही (PCMC Election)उद्भवले.
दुपारी तीन वाजल्यानंतर एबी फॉर्म स्वीकारले जात नसल्याने काही उमेदवारांनी अधिकाऱ्यांशी तीव्र चर्चा केली. गोंधळ वाढताच महापालिका आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न (PCMC Election)केला.
मात्र, नियमांनुसार दिलेल्या वेळेच्या अटी पाळणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ठरलेल्या वेळेनंतर एबी फॉर्म सादर न करणाऱ्या उमेदवारांना पक्षचिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात(PCMC Election)आली.
