प्रतिनिधी :पुण्यातील निगडी प्राधिकरणातील एका व्यक्तीला ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये बँक खाते पुरविल्याबद्दल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अरविंद बाबुलालजी लोढा (वय ५५, रा. टेल्को हौसिंग सोसायटी, सेक्टर २४, निगडी प्राधिकरण; सध्या रा. अजिंक्यतारा सोसायटी, सेक्टर २७, निगडी) असे (Arvind Lodha Arrest) आहे.
तपासात समोर आले की, परदेशातील सायबर चोरटे जास्त परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून लोकांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात. यासाठी भारतातील लोकांकडून कमिशनच्या लोभात बँक खाते वापरण्यास सांगितले जाते. खात्यात जमा झालेली रक्कम नंतर क्रिप्टो करंन्सीद्वारे परदेशात (Arvind Lodha Arrest)पाठविली जाते.
फसवणुकीत, फरियादींना विविध कंपन्यांचे शेअर्स किंवा आयपीओ खरेदी करण्याचे बहाणे करून ७३,६९,३९२ रुपये विविध बँक खात्यांमध्ये भरवले गेले. त्यापैकी ३०,८४,४९९ रुपये १० ट्रान्झेक्शनमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात आले. हे बँक खाते निगडी प्राधिकरणातील असून अरविंद लोढा याचे असल्याचे तपासात समोर (Arvind Lodha Arrest)आले.
बँकेकडून खातेधारकाची माहिती मिळवल्यानंतर, हे खाते ‘सुरज ट्रेडलाईन’ या नावाने असल्याचे आणि त्याचे मालक अरविंद लोढा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे सेक्टर २४ मधील हनुमान मंदिराजवळ १९ नोव्हेंबर रोजी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत दोन मोबाईल आणि तीन डेबीट कार्ड (Arvind Lodha Arrest)सापडले.
पोलिसांनी सांगितले की, या गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याचे आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या (Arvind Lodha Arrest)मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे व पोलीस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार संदेश कर्ण, राजुदास चव्हाण, अमर बनसोडे, प्रविणसिंग राजपूत, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे, शितल डांगे, आनंद भंडलकर, रवि राठोड आणि मरकड यांनी (Arvind Lodha Arrest)केली.
या प्रकरणामुळे ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये बँक खाते पुरवण्याच्या धोख्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्याची आवश्यकता स्पष्ट होते. पोलिसांनी नागरिकांना सांगितले की, कोणीही अनोळखी व्यक्तींना आपले बँक खाते वापरण्यास देऊ नये, अन्यथा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान (Arvind Lodha Arrest)होऊ शकते.
