भाजपाचे “विकासाचे व्हिजन” सर्वमान्य; संघटन अधिक बळकट – शंकर जगताप
पिंपरी, (प्रतिनिधी):
डॅमेज कंट्रोलसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपचे आमदार व निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडून मोठा राजकीय धक्का बसला आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भाजपवर तथ्यहीन आरोप करत उमेदवारांवर दबाव टाकून माघार घ्यायला लावली जात असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत हे आरोप अक्षरशः खोटे ठरवले (NCP Damage Pcmc)आहेत.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी या भागात भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली(NCP Damage Pcmc) आहे.
शनिवारी भक्ती-शक्ती समूह, निगडी येथील प्रांगणात प्रचाराचा नारळ फोडत भाजपच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळीमा. श्रीधरभाऊ वाल्हेकर (माजी सभापती, शिक्षण मंडळ),मा. राजेंद्र साळुंके (माजी नगरसेवक),मा. संदीप चिंचवडे (माजी नगरसेवक),मा. विनोद कांबळे (शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग – राष्ट्रवादी काँग्रेस),मा. सुरेंद्र भोईर (सामाजिक कार्यकर्ते),मा. सौ. रुपाली सचिन वाल्हेकर,मा. रत्नाताई भापकर,मा. सौ. मिराताई वाल्हेकर,मा. श्री. सचिन श्रीधर वाल्हेकर (उपाध्यक्ष, पिंपरी विधानसभा),मा. सूर्यकांत पात्रे (उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग)आणि मा. सुभाष वाल्हेकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश (NCP Damage Pcmc )केला.
या पक्षप्रवेशामुळे नवी सांगवी, सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात भाजपची ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यातील आरोप हे ‘स्क्रिप्टेड’ असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आजच्या पक्षप्रवेशामुळे हे सर्व आरोप निराधार ठरल्याचे भाजपने म्हटले (NCP Damage Pcmc) आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती समूहाच्या प्रांगणात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशाद्वारे भाजपने पुन्हा एकदा विजयाचा एल्गार केला(NCP Damage Pcmc) आहे.
“भाजप कधीही आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करत नाही. विरोधकांकडे जेव्हा मुद्दे उरत नाहीत, तेव्हा ते तथ्यहीन आरोप करतात. मात्र आम्ही आरोपांच्या राजकारणात न अडकता ‘विकासाच्या व्हिजन’वरच बोलणार आहोत आणि पिंपरी-चिंचवडला विकासाचे नवे पर्व दाखवून देणार आहोत. आजच्या पक्षप्रवेशाने हेच स्पष्ट झाले (NCP Damage Pcmc )आहे.”
— शंकर जगताप
आमदार व निवडणूक प्रमुख,
पिंपरी-चिंचवड शहर
