प्रतिनिधी :गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सतत वाढणाऱ्या किमतीमुळे ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होत आहे. तसेच, सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही बदल दिसून येत (Gold Silver Rate)आहेत.
बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,२४,७७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,१४,३७३ रुपये आहे. चांदीमध्येही किंमतीत बदल झाला असून, १ किलो चांदीचा दर १,५४,७७० रुपये तर १० ग्रॅम चांदीचा दर १,५४८ रुपये (Gold Silver Rate) आहे.
सोन्याच्या किमती शहरानुसार खालीलप्रमाणे आहेत:
मुंबई:
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,१४,१६२ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,२४,५४० रुपये
पुणे:
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,१४,१६२ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,२४,५४० रुपये
नागपूर:
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,१४,१६२ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,२४,५४० रुपये
नाशिक:
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,१४,१६२ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम): १,२४,५४० रुपये
सोन्याच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक सोन्याच्या किंमतीत बदल, डॉलरचे मूल्य आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमधील मागणी-पुरवठा यावर सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होतो.चांदीच्या किमतीतही वाढ झाली असून, गुंतवणूकदारांनी या बदलांकडे लक्ष देणे (Gold Silver Rate) गरजेचे आहे.