पिंपरी (दि. ८ मे २०२६) : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांपैकी श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे जतन, संवर्धन व दुरुस्तीच्या कामांसाठी १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार (Ganesh Temple Closed)आहेत.
अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरांमध्ये जतन, संवर्धन व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने या कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, त्याबद्दल चिंचवड देवस्थान ट्रस्टने शासनाचे आभार मानले(Ganesh Temple Closed) आहेत.
मागील दोन महिन्यांपासून मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे मंदिर परिसरातील विविध दुरुस्ती व संवर्धनाची कामे सुरू आहेत. आता मुख्य गाभारा आणि सभामंडपाचे पौराणिक शैलीतील दगडी बांधकाम जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची गर्दी आणि सततचा वावर यामुळे कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला(Ganesh Temple Closed) आहे.
पुरातत्त्व विभागाच्या विनंतीनंतर सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनी मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर जतन व संवर्धनाची कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत यासाठी तिन्ही मंदिरे एकाच वेळी बंद ठेवण्याचे आदेश ७ मे २०२६ रोजी जारी करण्यात (Ganesh Temple Closed)आले.
या आदेशानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही संबंधित मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच ८ मे रोजी पुरातत्त्व विभागाकडून ग्रामस्थांसोबत ग्रामसभा घेऊन या निर्णयाची माहिती देण्यात येणार (Ganesh Temple Closed)आहे.
महत्त्वाच्या सूचना
मंदिरांमध्ये नित्य पूजा, आरती आणि धार्मिक विधी नियमित सुरू राहतील.या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही.केवळ पुजारी, अधिकृत कर्मचारी, बांधकाम यंत्रणा, अधिकारी आणि विश्वस्त यांनाच प्रवेश दिला (Ganesh Temple Closed)जाईल.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, मंदिरांच्या दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या या विकासकामांना सर्वांनी सहकार्य (Ganesh Temple Closed)करावे.
