पिंपरी, दि. १ मे : नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डी संचलित श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात (Sarswati Vidyalay) आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. गोविंदराव दाभाडे उपस्थित होते. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू माळे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय कांबळे, पर्यवेक्षक गणेश भोने यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित (Sarswati Vidyalay)होते.
कार्यक्रमाची सुरुवात एनसीसी ऑफिसर धैर्यशील लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सेकंड महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कॅडेट्सनी सादर केलेल्या कवायत संचलनाने झाली. त्यानंतर डॉ. दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या महिला शिक्षकांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर (Sarswati Vidyalay) केले.

सार्जंट प्रचिती वाघचौरे यांनी ध्वजप्रतिज्ञा दिली, तर सार्जंट निधी हाताळकर यांनी परेडचे नेतृत्व केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी आणेकर यांनी केले, तर निवेदन मुमताज शेख यांनी (Sarswati Vidyalay) केले.
शिक्षिका शैला दौंडकर यांनी आपल्या मनोगतात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच कामगारांच्या हक्कांसाठीच्या जागतिक चळवळीमुळे १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी (Sarswati Vidyalay) सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप संध्या अभोणकर यांनी आभार प्रदर्शनाने (Sarswati Vidyalay) झाला.
