प्रतिनिधी : “यशस्वी उद्योजक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे यांच्या वतीने ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर होते, तर अध्यक्ष सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती (Tata Industry Award ) होती.
यावेळी तौरल इंडिया लिमिटेडचे सीईओ ॲल्युमिनियममॅन भरत गीते यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच साई ली इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक संदीप शिंदे-सरकार (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न), सिद्धकला ऑटो स्टॅम्पिंगचे संचालक सुधीर भांदुर्गा (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगविभूषण), वोगोफाय इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेडचे डॉ. गणेश घंगाळे (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगभूषण), एस. बी. आर. मशिन्स प्रा. लिमिटेडचे सीईओ गणेश राऊत (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण) आणि महेक इंडस्ट्रीजच्या संचालिका रेश्मा मुल्ला (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगसखी) यांचा सन्मान करण्यात (Tata Industry Award )आला.
प्रभुणे म्हणाले, “भगवान श्रीकृष्णांनी मांडलेला कर्मयोग भरत गीते यांनी आत्मसात केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून शतकपूर्तीकडे वाटचाल करताना हे उद्योजक भावी इतिहासातील सुवर्णपाने ठरतील.” पुरस्कार स्वीकारताना भरत गीते यांनी कामगार म्हणून सुरू झालेला प्रवास, ॲल्युमिनियम क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान भारतात आणण्याचा निर्धार आणि आत्मनिर्भर भारत अभियानातील सहभाग यांचा उल्लेख करत महाराष्ट्रात सुमारे लाख कोटींचे उद्योग उभारण्याचा संकल्प व्यक्त(Tata Industry Award) केला.
कार्यक्रमाची सुरुवात एका छोट्या बालिकेच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावर व्याख्यान दिले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले, पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला, तर अध्यक्षीय मनोगतात सचिन ईटकर यांनी उद्योजकांना राष्ट्रनिर्मितीचे रोल मॉडेल ठरवण्याचे आवाहन (Tata Industry Award) केले.
अरुण गराडे, प्रा. डॉ. संभाजी मलघे, महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, प्रतिमा काळे, इंद्रजित पाटोळे, राजू जाधव, प्रा. प्रभाकर दाभाडे आणि प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले, तर जयश्री श्रीखंडे यांनी आभार( Tata Industry Award)मानले.
